
कळसवलीच्या ग्रामसेवक श्रीम.सोनाली हिवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त बेल वृक्षांची लागवड.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे कळसवली ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.सोनाली हिवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सखी ग्राम संघाच्या महिला भगिनींतर्फे ग्रामपंचायत कार्यालय कळस वली येथे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

- श्रीम.हिवाळे यांनी कळसवली ग्रामपंचायतीची सुत्रे स्वि कारल्यापासून कारभार गतीमान केला शासन आयोजित वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग नोंदवत गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.
- श्रीम.हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा स्व च्छता अभियानात कळसवली ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला श्रीम हि वाळे यांना कळसवली ग्रामपंचायतीचा कारभार स्विकारु न दोन वर्षे पूर्ण झाली.
- या कालावधीत गावाला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला शाखा ग्राम संघ, कळसवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.देवेश गोविंद तळेकर, चुनाको ळवण सरपंच श्री.श्रीकांत मटकर, ग्रामपंचायत कर्मचारी परेश शेडेकर आणि संगणक परिचलक ऋतुजा बाणे या सर्वांनी वाढदिवस साजरा करून मोठे सरप्राइज दिले.

- यावेळी माता भगिनीचे प्रेम पाहून गहिवरून आले यावेळी ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











