
लांजा तालुक्यातील कुणने आरगावने राबविली लोकवर्गणी व लोकसहभागातून दत्तक सोलर स्ट्रीट लाईट संकल्पना.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मु.कु णने आरगाव गावातील मधील कुणबी वाडी(चिबडे वाडी) ग्रामस्थ मंडळाने लोकवर्गणी व लोकसहभागातून दत्तक सोलर स्ट्रीट लाईट या संकल्पनेवर आधारित एक प्रोजेक्ट सादर केला होता.
- याला निर्मल ग्रामपंचायत आरगांवच्या सरपंच सौ शमिका शैलेश खामकर यांनी प्रतिसाद देत राम मंदिर ते राजापक र वाडी रस्ताला ग्रामपंचायती मार्फत ५ स्ट्रीट लाईट दिल्या आहेत.
- तसेच या उपक्रमाला श्री.लक्ष्मीनारायण श्रीगाडी, श्री अज य बाळकृष्ण परब, श्री संजय विठ्ठल काणसे, श्री.जगन्नाथ रामचंद्र राजापकर व नामदेव तुकाराम राजापकर,श्री.मनो हर रामचंद्र खामकर, श्री.अरूण काशिराम खामकर, श्री जनार्दन रावजी भेरे, श्री.शिवाजी विठू राजापकर,श्री.प्रका श यशवंत राजापकर ,श्री प्रवेश शांताराम भेरे, यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत एक एक स्ट्रीट लाईट देणगी दाखल देण्यात आली.
- तसेच सोलर स्ट्रीट लाईट बसविणारे स्वयंभू इंटरप्राईजेस चे श्री शिवगण यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा देत एक स्ट्रीट लाईट भेट दिली.
- ग्रामपंचायत आरगांवच्या सरपंच सौ शमिका खामकर आ णि सर्वांच्या सहकार्याबद्दल आरगाव कुणबीवाडी ( चिबडे वाडी) यांच्या तर्फे आभार मानण्यात आले.
- राममंदिर रोडचे उद्घाटन जिल्हा बॅक संचालक मा.श्री.महे श खामकर यांच्या हस्ते झाले. तसेच सोलर स्ट्रीट लाईट या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन आरगांव कुणने गावच्या सरपंच सौ शमिका शैलेश खामकर व श्री शैलेश खामकर याच्या हस्ते झाले.
- या प्रसंगी प्रभाकर चिबडे, मंगेश चिबडे, संजय कानसे, रा जाराम चिबडे अध्यक्ष तुकाराम चिबडे ग्रामपंचायत सदस्य श्री रविंद्र चिबडे व स्थानिक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/