‘कोड ब्ल्यू’ मुळे हजारो जणांना जीवदान….! ससून रुग्णालयात होताहेत रोज ६ जणांवर आपत्कालीन उपचार…!

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- ससून सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्या साठी ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा जुलै २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली.
  • ही यंत्रणा सुरू करणारे ससून हे राज्यातील पहिले सरका री रुग्णालय ठरले होते.
  • या यंत्रणेमुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत रुग्णाला उपचार मिळत असून, गेल्या दोन वर्षांत दररोज सुमारे सहा जणांना ही मदत मिळाली आहे.
  • ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ ची सुरुवात १ जुलै २०२३ रोजी झाली. रुग्णालयात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२३ या का लावधीत ९७२ वेळा यंत्रणेचा वापर झाला.
  • त्यानंतर २०२४ मध्ये या यंत्रणेचा २ हजार ४०२ वेळा वाप र झाला. यावर्षी जानेवारी ते २३ मेदरम्यान १,०२२ वेळा या यंत्रणेचा वापर झाला.
  • ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ सुरू झाल्यापासून जुलै २०२३ ते मे २०२५ या कालावधीत एकूण ४ हजार ३९६ रुग्णांवर आपत्कालीन स्थितीत उपचार झाले आहेत.
  • त्यातील ५० टक्के रुग्ण श्वास घेण्यास त्रास होणारे आणि १५ टक्के रुग्ण हे हृदयक्रिया बंद पडलेले होते. या रुग्णां ना वाचविण्यात यश आले.
  • मात्र, आपत्कालीन उपचार करूनही ३० ते ३५ टक्के रु ग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • मृत्यू झालेले रुग्ण हे सहव्याधी आणि कर्करोगासह इतर गंभीर आजार असलेले होते, अशी माहिती ससून रुग्णाल याच्या प्रशासनाने दिली.
  • ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक असतात.
  • याचबरोबर रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांचेही नाते वाईक असतात.
  • एखाद्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तातडीने उपचार कर ण्याची परिस्थिती उद्भवते.
  • हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास पहिले दहा मिनिटे हा सुवर्णकाळ मानला जातो. त्या कालावधीत उपचार झा ल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. हाच विचार करून ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा सुरू झाली.
  • या यंत्रणेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, ते २४ तास उपलब्ध आहे. या पथकात डॉक्टर, भूलतज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ, परिचारिका आणि परिचरांचा समावेश आहे.
  • डॉ.किरण जाधव हे ‘कोड ब्ल्यू’चे मुख्य समन्वयक असून, गौरव महापुरे हे समन्वयक आहेत.
  • ‘कोड ब्ल्यू’ कशाप्रकारे काम करते
  • रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास ध्वनिक्षेपक यंत्रणेवरून उद्घोषणा.
  • रुग्णालयातील कोणत्याही विभागातून सात क्रमांक डाय ल करून ‘कोड ब्ल्यू’ पथकाला पाचारण करण्याची सुविधा.
  • कोड ब्ल्यू पथकाकडून १२० सेकंदांच्या आत संबंधित रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर तातडीचे उपचार.
  • ससूनमधील ‘कोड ब्ल्यू’
  • कालावधी – उपचार झालेले रुग्ण
  • १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२३ – ९७२
  • १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ – २,४०२
  • १ जानेवारी ते २३ मे २०२५ – १,०२२
  • एकूण रुग्ण – ४,३९६
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles