मसूरकरवाडी ग्रामस्थ विकास मंडळ, ओशिवळे, आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि साई भंडारा मोठ्या उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-मसूरकरवाडी ग्राम स्थ विकास मंडळ, ओशिवळे, आयोजित श्री.सत्यनाराय ण महापूजा आणि श्री साई भंडारा, शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी संपन्न झाला.
  • शुक्रवार दि. १६ मे २०२५ रोजी श्री साईंच्या पालखीची भव्य मुरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मसुरकरवाडीला अखंड पाणीपुरवठा करणाऱ्या श्री.जल देवता विहिरीची मानाची ओटी भरून यथासांग पूजा करण्यात आली.
  • शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता श्री.साई बाबा व श्री गणेश यांच्या मूर्तीची यथासांग पूजा आणि श्री सत्यनारायणाची महापूजा गुरुजी श्री मंदार सप्रे ह्यांच्या हस्ते करण्यात आली.
  • श्री सत्यनारायणाची महाआरती करून उपस्थित सर्व सा ई-गणेश भक्तांनी तीर्थ प्रसाद आणि श्री साई भंडाऱ्याचा लाभ घेतला.
  • सायंकाळी मसुरकरवाडी महिला मंडळाचा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.
  • तसेच लहान मुलांच्या विविध मैदानी खेळाच्या स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. रात्री गांगणवाडी आणि मसुरकरवाडीतील ग्रामस्थ मिळून अत्यंत सुरेख ढोलवादन करण्यात आले.
  • श्री.जांगलदेव प्रासादिक भजन मंडळ, नाचणेकरवाडी क्र.१ यांच्या सुस्वर भजनाचा आस्वाद वाडीतील तसेच गावातील अनेक मंडळींनी घेतला.
  • रात्रौ स्वागत समारंभ आणि बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न झाला. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यश स्वी विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.
  • तसेच डॉ. प्रकाश बाळकृष्ण मसुरकर यांनी वाडीतील गर जू आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण न घेणा ऱ्या मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) चा धनादेश शैक्षणिक मदत म्हणून मंडळाकडे सुपूर्द केला.
  • मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले वाडी तील लहान-थोर मंडळींनी गरबा नृत्याचा आनंद घेत श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री साई भंडारा २०२५ उत्सवाची मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली.
  • कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नारायण मसुर कर, सचिव श्री रामदास मनोहर भरतव, माजी अध्यक्ष श्री.एकनाथ मसुरकर, माजी सचिव श्री रमेश पेटकुळकर, डॉ.प्रकाश बाळकृष्ण मसुरकर (P.HD), आणि इतर सर्व सभासद तसेच श्री संतोष मसुरकर, श्री शांताराम मसुरक र, श्री.पंढरीनाथ मसुरकर, श्री अविनाश पेटकुळकर आ णि इतर सर्व ग्रामस्थ तसेच श्री यशवंत बाणे, श्री.संतोष कानडे, श्री मनोहर कानडे, श्री मनोहर नारकर, श्री सुरेश कानडे, श्री अनंत नारकर, श्री शांताराम मांडवे आदि मान्यवर उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles