प्रतापपूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहाचा जल्लोष.

  • प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- गोपाल कृष्ण गणेश मित्र मंड ळाच्या वतीने प्रतापपूर गावात गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने पार पडली.
  • सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळनंतर सुरू झालेल्या मिरवणुकीत ग्रामस्थां चा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
  • या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले राजकमल बँड सटाणा यांचे सुरेल वादन तसेच आकर्षक विद्युत रोषणाई. भव्य फटाक्यांची आतषबाजी होताच वातावरण जल्लोष मय झाले. आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
  • गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सह‌ भाग नोंदवला. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
  • गावात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे दर्शन या मिरवणुकीत घडले.
  • मिरवणूक यशस्वी पार पाडण्यात मंडळाचे आयोजक श्री. धनराज गांगुर्डे,श्री.जितेंद्र गांगुर्डे,श्री.विनोद गांगुर्डे श्री.हर्ष ल ठाकरे, श्री.सुधीर गांगुर्डे, श्री.भूषण गांगुर्डे, श्री भूषण ठाकरे तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री.पराग गांगुर्डे, श्री.मनोज शिंदे तसेच सागर गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, अमोल ठाकरे, क ल्पेश गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, चेतक गांगुर्डे, विशाल कुवर, चे तन गांगुर्डे, भूपेश शिंदे, दुर्गेश शिंदे, तुषार गांगुर्डे यांनी मो लाचे योगदान दिले.
  • त्यांनी सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
  • सुरक्षित आणि सुरळीत विसर्जन मिरवणुकीसाठी साक्री पो लीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दीपक वळवी यां च्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  • शिस्तबद्ध आणि शांततेत मिरवणूक पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांनीही पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
  • गणेशोत्सवाच्या सात दिवसांत गावात भक्तिभावाचे वाता वरण अनुभवायला मिळाले. विसर्जनाच्या मिरवणुकीने उत्सवाचा भव्य समारोप झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles