
भाग्यवंत आम्ही सहवास आपला लाभला, तुम्हा विना जीणे असह्य जाहले आजला ; संजय लोटणकर यांच्या जाण्याने संगमेश्वर मधील करंबेळे पंचक्रोशीवर शोककळा.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे करंबेळे पंचक्रोशीतील कै. संजय राजाराम लोटणकर रा.मुक्काम पोस्ट करंबेळे, तालुका संगमेश्वर जिल्हा रत्ना गिरी यांना अकस्मात अवघ्या 62 व्या वर्षी देवाज्ञा झाली.
- आर.टी.ओम ध्ये विविध ठिकाणी अधिकारी म्हणून काम करत असताना स्वतःचे एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले होते राजकारण समाजकारण क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःचे वलय निर्माण केले होते.
- अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन व्यतीत करत अ सताना पंचक्रोशी मधील सर्वांच्याच पाठीशी ते आधारस्तं भ म्हणून खंबीरपणे उभे राहिले.

- गावातील ग्रामदेवतेचे मंदिराचे बांधकाम असो की गावाती ल रस्ता असो किंवा अंतर तालुका क्रीडा स्पर्धा असो को णती ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.
- निवृत्तीनंतर अवघ्या चार वर्षात गावामध्ये वास्तव्यास येऊ न समाजासाठी प्रत्येक क्षण व्यतीत केला विविध साई बा बा स्वामी समर्थ शंकर महाराज दत्त संस्थान संबंधित अने क धार्मिक मंडळांचे ते मुख्य आधारस्तंभ होते.
- चाळीस वर्ष अविरतपणे भायखळा मुंबई येथे शिर्डी पदया त्रा केली किती तरी वेळा नर्मदा परिक्रमा गिरनार पदयात्रा पार पडल्या.
- आपल्या कर्मवीर गावी दर पौर्णिमेला ग्रामभोजन तर वि विध मंडळांमध्ये दरवर्षी भंडारा आयोजित केला. विविध धार्मिक मंडळे धर्मस्थळे यांना भरभरून दानधर्म केला.
- गोरगरीब गरजू यांना मदतीचा हात कायमच पुढे केला जे जे आपल्यापाशी तेथे स्वतःसाठी काहीही राखून ठेवण्या ऐवजी लोकांच्या भल्यासाठी भरभरून देऊ केले.
- दुर्दम्य इच्छाशक्ती उदंड आत्मविश्वास शरीर आणि सकारा त्मक दृष्टिकोनाचा आदर्श आपल्या प्रत्यक्ष आपल्या कृती तून समाजाला दिला.
- त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस आपला मोठा आधार दिसून येई आपला मोठा भाऊ महाराज बुवा भाई दादा अशा विविध भूमिकांमध्ये वावरणारे श्री.संजय लोट णकर यांच्या या आकस्मिक निधनाने साऱ्यांना जणू आप ण पोरके झाल्याची भावना दाटून आली.
- असून सारेच जण आज शोकसागरात बुडाले आहेत. ऐसा धीर गंभीर भर भक्कम सर्वांचा पाठीराखा दुजा कोणी होणे नाही.
- त्यांच्या जाण्याने लोटणकर परिवारासह करंबेळे पंचक्रो शी तसेच संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
- त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व एक मुलगा आहे त्यांचे दहा वे २८ जुलै व बारावे ३० जुलै रोजी करंबेळे देवरुख ता. सं गमेश्वर येथे राहत्या घरी होणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











