
बावची विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : फारुख शेख :- परंडा, दि. 6 जुलै : बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृ त्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणा ऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
- याच कार्यक्रमात उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेती ल विजेत्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारा यण खैरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परंडा केंद्राचे नवनिर्वा चित केंद्रप्रमुख श्री. नितीन बोराडे व श्री. प्रशांत माने उप स्थित होते.

- स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल श्री. नि तीन बोराडे यांचा प्राचार्य श्री. नारायण खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- यानंतर इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या एकूण ३९ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मा नचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
- तसेच उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील विजेते विद्यार्थी तन्मय बालाजी शिंदे, संस्कृती समाधान देवकर आणि सिद्धी सचिन गरड यांचाही विशेष सत्कार करण्या त आला.
- विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी परि श्रम घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
- यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख श्री. नितीन बोराडे यांनी विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, स्पर्धा परी क्षा तयारी व विविध उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरा वर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन केले.
- प्राचार्य श्री. नारायण खैरे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, नवोदय, विविध स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्ता विकास उपक्रमांची माहिती देत गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
- विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सह कार्य आणि विद्यार्थ्यांची चिकाटी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.शुभम रोडगे यांनी मानले.
- कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म चारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २७ तर इयत्ता ८ वी शिष्य वृत्ती परीक्षेत १२ विद्यार्थी पात्र ठरल्याने विद्यालयाच्या शै क्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






