उपमुख्यमंत्री आजित पवार यांचे निधन झाल्यामुळे दुखवटा म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ रोजी मतदान ९ रोजी मतमोजणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- दि.२९ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रि क निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला.
  • तसेच ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.
  • राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
  • त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
  • त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
  • मा.सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यं त दुखवटा जाहीर केला आहे.
  • या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यां मध्ये बदल करण्यात आले आहेत.
  • त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक का र्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करती ल. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं काळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
  • त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रो जी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचार संहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.
  • आशे आदेश महाराष्ट्रचे सचिव राज्य निवडणूक आयोग सुरेश काकाणी याणी देले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles