
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील स्टाफतर्फे श्री ज्ञानदेव रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- नॅशनल रेल्वे मज दूर युनियन, कोंकण रेल्वे, रत्नागिरी शाखेतील रनिंग कर्म चाऱ्यांचा पंढरपूर २०२५ च्या वारीत एक समाजसेवी उपक्रम केला.
- एन.आर.एम.यु (कोकण रेल्वे/मध्य रेल्वे) चे महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संघटनेच्या कोंकण रेल्वेच्या रनिंग स्टाफ कर्मचाऱ्यांनी खुडूस रिंगण ते वेळापूर पर्यंत श्री ज्ञानदेवांच्या रथ पालखी सोहळ्यात चालण्याचा आनंद घेतला.
- तसेच वारीत चालत असलेल्या भाविकांना खाऊ भेट म्ह णून ६००० बिस्किट पुडे वाटण्याचा उपक्रम केला.
- दि. २ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात सचिव काॅ.मिथुन शिंदे, आयोजक सचिव काॅ.सिद्धेश पवार, सहा य्यक अध्यक्ष काॅ.संदीप घोलप, सदस्य काॅ. मंगेश जंगम, काॅ अमित पाडळकर, काॅ.संजय तोडकरी, काॅ. अशोक गांधी, काॅ सचिन म्हाडगुत, काॅ सचिन साळवी,काॅ प्रकाश कावणकर,काॅ उतकेश जाधव, काॅ संजय खरिवले आणि काॅ प्रवीण दैत आदी पदाधिकारी सदस्य यांनी सहभाग घेतला होता.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/