
बचूकडू यांना पाठींबा परंडा येथे प्रहार सघटनेकडून रस्ता रोको.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ब च्चू कडू गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे शेतकऱ्या ची कर्जमाफी झाली पाहिजे व दिव्यांगांना प्रति महिना ६ हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे, अशा मागण्या घेऊन दि.८ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.
- परंतु सरकार त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा म्हणून धारा शिव जिल्ह्यातील परंडयात प्रहार संघटनेच्या वतीने रॅली काढत रस्ता रोको आंदोलन करण्या आले.
- यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नाग नाथ नरुटे पाटील, अपा तरटे, भरत नन्नवरे, हरी सरगर, रेवण जानकर,बाळू काळे, गोकुळ गवळी, अण्णा कोचळे, सोमनाथ गायकवाड, धनाजी गायकवाड, संदीप गायकवा ड, हंबीरराव मोरे, संजय लटके, अभिमान काळे, दिलीप काळे, मेघराज नरोटे, बाळू शिंदे, करंडे रघुनाथ, अंकुश आ हेर,धनंजय गोपने,शिवाजी ठवरे, तानाजी घोडके, तानाजी सांगडे आदीसह कार्यकर्ते महिला सह शेकडो उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











