नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल………. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल……….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: इरफान शेखजी शेख : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन केंद्रे सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील उमेदवारांची बैठक व्यवस्था, याची माहिती संकलित केली जात आहे.

‘खासगी’ला मुलाखतीचे बंधन

खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती. आता ‘टेट’मुळे त्याला लगाम लागणार आहे. एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार होईल.

दोन टप्प्यांत ६५ हजार शिक्षक भरती

सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्यात शिक्षकभरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.                                                                                                                                           सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा