
लायन्सतर्फे मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसा यटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन यांच्यावतीने करण्यात आला.
- भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यां चा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

- या दिवसाचे औचित्य साधून मॉडर्न हायस्कुल इंग्रजी मा ध्यमातील शिक्षकांना उत्तम शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
- यावेळी लायन्स क्लबचे खजिनदार संदेश मुखेडकर,लिओ ओमेगाचे खजिनदार अश्विन गुडसुरकर,मोरया अकॅडमीचे संचालक प्रा.नितीन साळी,मुख्याध्यापिका गौरी सावंत उपस्थित होत्या.
- संदेश मुखेडकर यांनी पालकांनी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे असे सांगितले.तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान दानाबरोबर शाळेबाहेरील व्यवहारज्ञान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
- यावेळी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका ज्योत्स्ना शिंदे, सोना ली गावकर,डोमिनिका रॉबिनसन,पल्लवी कुलकर्णी,दीपा वायकोळे,ममता गाडे,मधुकर रासकर यांचा आदर्श शिक्ष क म्हणून सत्कार करण्यात आला.

- या शिक्षकांचे कौतुक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबो टे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष दीपक मराठे,व्हिजिटर अतु ल फाटक यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









