
कुणबी समाजाचे नियोजनबद्ध आंदोलन, रणनिती ठरली, ७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढत आंदोलनाला सुरुवात.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-दि.१० रोजी परेल ये थील संघ कार्यालयात झालेल्या बैठकीत दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आझाद मैदान येथे कुणबी समाजाचा मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे असा एकमुखी ठराव बैठकीत करण्यात आला.

- यावेळी संघाध्यक्ष अनिलजी नवगणे यांनी आपल्या कार्य कारिणी सहित तालुक्यातील शाखांचे पदाधिकारी, संघ प्र तिनिधी, समाजाच्या इतर संघटना यांना नियोजन सभेला पाचारण केले होते.

- अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असून त्याची रणनीती ठरविण्यात आली.
- संघाच्या वतीने समाजातील वकिलांना एकत्र घेऊन लवक रच मुंबई उच्च न्यायालयात शासनाने काढलेल्या जीआर विरोधात पिटीशन दाखल करुन दाद मागण्यात येणार आहे.

- तसेच शाखांतर्फे ग्रामीण व मुंबईत घरोघरी जाऊन आरक्ष ण बचाव करता व आंदोलनात सहभागी होण्यासाठी जन जागृती करण्याकरिता आंदोलन समिती स्थापन करण्यात आली.

- संघाध्यक्ष अनिल नवघने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या आंदोलनात ओबीसी संघटनांच्या इतर समाज घटकांना देखील बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

- यावेळी उपस्थित संघाचे माजी अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा चे कार्याध्यक्ष श्री चंद्रकांतजी बावकर त्याचप्रमाणे संघाचे उपाध्यक्ष श्री.म्हसकर, उदय कटे,अवधूत तोरस्कर, सरचि टणीस कृष्णा वने, खजिनदार महेश शिर्के, राजकीय संघ टन समितीचे अशोक वालम, नवी मुंबईचे मा. उपमहापौर अविनाश लाड, माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, अर विंद डाफळे,पांडुरंगजी उपळकर, रविंद्र मटकर, अनिलजी भोंवड, माधव कांबळे, प्रमोद खेराडे,ऍड सुभाष बान, ऍड महेंद्र मांवकर, ऍड मंगेश हुमणे व इतर अनेक समाज बांध व मोठया संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











