
डॉ.प्रतापसिह पाटिल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल येथे शुक्रवारी (८ ऑगस्ट) रोजी स्कॉलरशि प, नवोदय, एमटीएस, मंथन, इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेतील उत्कृष्ट गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
- या प्रसंगी धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देत गौरविण्यात आले.

- महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ३ री मधून श्रेयश चंद्रकांत सुर्य वंशी केंद्रात प्रथम व राज्यात २२ वा, ७ वो मधील जुहिरा अयुब मुजावर केंद्रात प्रथम, राज्यात ३८ वा क्रमांक मिळ वला तर
- मंथन परीक्षेत ३ री मधील श्रेयश चंद्रकात सुर्यवंशी केंद्रात दुसरा तर राज्यात ३२ वा, तसेच ७ वी तील आरुषी देवान पाटील केंद्रात दुसरी व राज्यात तिने २९ वा मिळवला.
- इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत पहिलीतील अर्णव तानाजी गर ड राज्यात ५ वा, दुसरीतुन अनन्या अमोल जाधव राज्यात २२ वा तर ९ वी तील आवेज अजिम मुजावर राज्यात २२ वा क्रमांक मिळवत या सर्वांनी उत्कृष्ट यश मिळवले.
- पाचवीतील शिष्यवृत्ती परिक्षेतील पात्र विद्यार्थ्यांमध्ये स लोनी शाम जाधव, भक्ती आनंद खराडे, राजवी किशोर चै तन्य, राजकन्या विक्रम जगताप तर सातारा सैनिक स्कूल साठी निवड झालेला विद्यार्थी प्रज्वल राजकुमार गरड व स्पर्धा परीक्षाचे प्रमुख हर्षद फासे यांचा सत्कार करण्यात आला.
- यावेळी प्राचार्य संतोष भांडवलकर,सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी नांगरे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











