
मुंबई – गोवा महामार्ग सिमेंट काॅंक्रीटीकरणासाठी कोकण संघटन समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पागडे साहेब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोकणातील सर्वात मोठा सण गौरी गणपतीचा सण तोंडावर आला असून मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था अद्याप दयनीय आहे.
- सदर रस्त्याची दरवर्षी डागडुजी करण्यापेक्षा कायमस्वरू पी तोडगा म्हणून सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्याशिवाय प र्याय नाही मुंबई गोवा महामार्गाची होणारी वाताहत थांब वा याकरिता ठोस उपाययोजना करावी.

- अशी मागणी कोकण संघटन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री सुर्यकांत गोविंद पागडे साहेब यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.
- राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते आंबेत टोलनाका ते दापो ली एसटी स्थानक तसेच आंबेत टोलनाका ते गुहागर एस. टी बसस्थानक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

- कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर अने क ठिकाणी खड्डे पडले आहेत. यावर्षी तरी गणेशभक्तांना या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.
- प्रवाशांची या संकटातून मुक्तता करण्यासाठी सिमेंट काॅं क्रिटीकरण करावे अशी मागणी श्री पागडे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











