
ZP निवडणुकांआधीच महायुतीत रस्सीखेच, भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार?
- प्रतिनिधी : फारूख शेख :-धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाले. अध्यक्षपद हे सर्वसा धारण महिलांसाठी खुले झाले आहे. धाराशिव जिल्हा परि षदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी सत्ता होती.
- त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने सत्ता हस्तगत केली. ग्रा मविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव डणुकांआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती अशा विविध पदांसाठी आरक्षण जाहीर करण्या त आलं आहे.

- त्यानंतर आता धाराशिवमध्ये महायुतीतचं जिल्हा परिषदे च्या अध्यक्षपदावरुन रस्सीखेच होताना बघायला मिळत आहे.
- भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या प क्षाच्या महिला नेत्याच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
- याचाच अर्थ धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून दावा केला जाताना दिसत आहे.
- त्यामुळे आगामी काळात महायुतीत धाराशिवच्या अध्यक्ष पदावरुन मतभेद होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
- भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्य क्षा आहेत.
- पण त्यांच्या नावाने भावी जिल्हा परिषद अध्यक्षा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून याबाबत ची पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.
- तर माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- यामुळे अर्चना पाटील विरुद्ध ज्योती सावंत अशी अध्यक्ष पदासाठी स्पर्धा भविष्यात पाहायला मिळू शकते.
- अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा अशी पो स्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच शिंदे गटाकडून ज्योतीताई सावंत जिल्हा परिषद भावी अध्यक्षा अशी पो स्ट व्हायरल केली गेली आहे. सपूर्ण जिल्हाल्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











