अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने मीरा भाईंदर येथील दुर्गम भागात असणाऱ्या मनपा शाळेत शैक्षणिक तक्ता व लेझीम चे वितरण संपन्न.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- १५ जुलै हा जोगेश्वरीती ल परब क्लासेसचे सर अंकुश परब यांचा जन्मदिवस त्यांच्या अंगी असलेल्या दातृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी, हितचिंतक, मित्र परिवार यांनी पुढे येऊन शिक्षण क्षेत्रातील हा वारसा गरिबातल्या गरीब वि द्यार्थी पर्यंत पोहचावे म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक सेवेचे उपक्रम राबविण्यात येतात.
  • त्याचाच एक भाग म्हणून १५ जुलै रोजी मीरारोड पूर्व ये थील माश्याचा पाडा, ग्रीन व्हिलेज या मनपा शाळेत जाऊ न त्यांना आवश्यक असणारे मोठ्या आकाराचे शैक्षणिक ४२ तक्ते भेट म्हणून देण्यात आले. प्रत्यक्ष शाळेत जाऊन हा कार्यक्रम पार पडला.
  • या प्रसंगी लेझीम साहित्य ही देण्यात आले. चालता बोल ता शिकता यावे म्हणून हे तक्ते नक्कीच विद्यार्थ्यांना फाय देशीर होतील असे या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यां नी आभाराच्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • एकीकडे मनपा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता या शाळेचे शिक्षक गणेश राणे आणि शिंदे सरांच्या कौशल्यामुळे आज या शाळेत ६५० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत.
  • दुर्गम भागात असलेली ही शाळा आदिवासी पाड्यातून ये णारे विद्यार्थी तसेच इतर भाषिक विद्यार्थ्यांना मराठी भाषे चे ही ज्ञान व्हावे, उत्तम शिक्षण देऊन पुढे नेण्याच्या या प्रयत्नांचे अंकुश सर प्रतिष्ठानच्या संस्थापक तसेच अंकुश सरांच्या पत्नी डॉ.संगीता परब उप प्राचार्या जय हिंद कॉले ज यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे कौतुक करून आ वश्यक वाटल्यास राष्ट्रीय सेवा योजना जय हिंद कॉलेज यांचे नियमित सहकार्य आपणास मिळेल विद्यार्थ्यांना म दत करण्यास निश्चितच आवडेल असे सांगून सेवेची संधी दिल्याबाबत आभार व्यक्त केले.
  • या प्रसंगी आर्थिक मदतीचा धनादेश ही शाळेस सुपूर्द कर ण्यात आला.तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी यांनी शा लेय साहित्य ही या विद्यार्थांना भेट म्हणून दिली.
  • या कार्यक्रमास अंकुश सर यांचे भाऊ लऊ सर, विवेक सा वंत, सौ.वनिता सावंत,श्लोक सावंत, अरविंद जाधव,विद्या र्थी अनिल म्हसकर, सौ.क्षमा म्हसकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जय हिंद कॉलेजचे समन्वयक डॉ.बालकृष्ण रंगो ली व जय हिंद कॉलेजचे सर्वेसर्वा प्राचार्य माननीय डॉक्टर विजय दाभोळकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.
  • खऱ्या अर्थाने सरांचा हा वारसा सार्थक झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाचे भाव होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles