
पत्रकार अंकुश पोटले आणि त्यांचे सहकारी शिक्षक सुधाकर आर्डे यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन आणि वितरण.
- प्रतिनीधी : काजिर्डा : प्रमोद तरळ :- लोकनिर्माण वृत्त पत्राचे ११ व्या वर्षाचे आरती संग्रह लोकनिर्माण प्रिंट ॲंड डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमि त्ताने आरती संग्रह काढण्यात आला होता.
- त्याचे प्रकाशन आणि वितरण राजापूर तालुक्यातील का जिर्डा गाव या ठिकाणी गणपत सुतार व एकनाथ सुतार यांच्या कारखाण्यामध्ये गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले.

- लोक निर्माण वृत्तपत्र समुहाच्या माध्यमातून तब्बल दहा हजार प्रति एकाच वेळी छापून १६ जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आले. त्या मध्ये पाचल प्रतिनीधी अंकुश पोटले यांनी ३०० प्रतीचे गणेश भक्तांना वाटप केले.
- यामध्ये पाचल विभागातील जाहिरातदार यांचा समावेश आहे.
- लोकनिर्माण गेली दहा वर्षे पर्यावरणावर आधारित आरती संग्रह प्रकाशित करत असतो. या वर्षाचा पर्यावरण पुरक अकराव्या वर्षाचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला.
- यामध्ये गणपती निमित्ताने आरास करतो त्यामध्ये थर्मा कोल, प्लास्टिक, टाचण्या, फुले, खिळे यांचा वापर करतो.
- गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण हे सर्व जेथे गणपती विसर्जन करतो ते नदी, तलाव, परे, ओढे, या ठिकाणी टाकतो.
- हे विघटन न होणारे साहित्य प्रदुषित करतात तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, आजारांना आमंत्रण देत असतो.
- महापूरासारखे प्रसंग ओढावले जातात. याकरिता श्रद्धा वान गणेश भक्तांनी प्लास्टिक चा वापर करु नये, जे निर्माल्य ( हार फुले) ही जवळपास असलेल्या झाडांना टाकल्यास खत निर्मिती होऊन ते झाड आपणास फळे म्हणजे गणेशाचे आशिर्वाद मिळते.
- आम्ही पर्यावरण वाचविण्यासाठी या आरती संग्रहातून प्रबोधन करत आहोत.
- अशा प्रमाणे अनेक जनांना आरती संग्रह देत लोकनिर्माण डिजीटल मिडीया, पेपर, चॅनल, घराघरात पोचवून नांव लौकीक करण्यात आले.
- या आरती संग्रहाचे वितरण काजिर्डा गावचे आणि ता. चि पळूण मधील शाळा आंबेरे बुद्रुक या शाळेला सध्या सेवा देणारे सुधाकर आर्डे (सर) यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

- त्या प्रसंगी काजिर्डा गावामध्ये सात वाडीतील अनेक भ क्तगण गणपती नेण्यास आले होते. त्या मध्ये सर्व लोकांना आरती संग्रहाची पुस्तके देण्यात आली.
- त्यामध्ये बाळकृष्ण सावंत, सुरेश पांचाळ, गणपत पांचा ळ, उदय जोशी,आनंदा जोशी, अनंत ( पिंट्या ) पांचाळ, पिंट्या आर्डे, प्रविण आर्डे, दौलत आर्डे, शांताराम हडशी, बारक्या मांडवकर, महेंद्र आर्डे, दिलीप पवार, अशा अनेक गणेश भक्तांना प्रती देवून वितरण करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






