आम्हाला नेता नको काम करणारा प्रतिनिधी हवा….! सचिन येरोजवार सामाजिक कार्यकर्ता.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- लोकशाहीच्या मूलभूत रच नेत स्वराज्य संस्थांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
  • ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत अशा संस्था म्हणजेच जनतेच्या हक्काचे शासन — “स्वरा ज्याचे प्रत्यक्ष रूप” मात्र आज या संस्थांच्या निवडणुका प्रामाणिकतेपेक्षा पैशाच्या बळावर लढवल्या जात अस ल्याचे चित्र समाजासमोर उभे राहिले आहे.
  • अनेक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरतात; परंतु सर्वांची मानसिकता सारखी नसते. काही जण समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याची भावना बाळगतात,तर काही जण सत्तेचा मोह आणि वैयक्तिक स्वार्थ मनात ठेवून निवडणु कीत उतरताना दिसतात.
  • समाजहितासाठी कार्य करणारे उमेदवार जनतेच्या संप र्कात राहतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या वर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.
  • तर दुसरीकडे पैशाच्या जोरावर प्रचार करणारे उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेपासून दूर जातात, अशी कटू वास्तवता अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
  • जनतेच्या अपेक्षा साध्या पण स्पष्ट आहेत — त्यांना हवा आहे प्रामाणिक, उपलब्ध आणि कार्यक्षम प्रतिनिधी. जन तेला पैसा, भेटवस्तू किंवा दिखावा नको आहे; त्यांना हवा आहे विश्वासार्ह आणि जनतेच्या हितासाठी काम करणारा नेता. गावात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारा च्या संधी निर्माण व्हाव्यात, हीच जनतेची खरी मागणी आहे.
  • मात्र आजच्या निवडणुकांमध्ये प्रामाणिक पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
  • जनतेचा विश्वास आणि कामाची पार्श्वभूमी असूनही त्यां च्याकडे प्रचारासाठी आवश्यक आर्थिक साधने नसल्याने ते मागे पडतात.
  • पैशाचा खेळ, मोठमोठ्या जाहिराती आणि बाह्य आडंबर यांच्या आड त्यांची प्रामाणिकता झाकोळली जाते.
  • तरीदेखील काही जिद्दी समाजसेवक आजही “पैसा नाही पण समाजासाठी जिद्द आहे” या विचारातून निवडणुकीत उतरतात.
  • अशा उमेदवारांची ओळख आणि त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणे, हेच खऱ्या अर्थाने स्वराज्याचे बळ ठरेल.
  • लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर मतदारां नी विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे.
  • पैसा आणि दिखावा याकडे न पाहता, जनतेसाठी प्रामाणि‌ कपणे काम करणाऱ्या उमेदवारालाच निवडणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तेव्हाच खरे स्वराज्य तेव्हा च प्रस्थापित होईल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles