विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श समोर ठेवावा – मिलिंद एकबोटे. 

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- शालेय जीवनापासून वि द्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेव‌ ल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा मिळू शकते,तसेच विद्यार्थ्यांनी शिवरायांचे बुद्धीचातुर्य, अचुक निर्णयक्षमता,संयमीपणा आणि अविरत कार्यप्रवणता हे गुण अंगीकारल्यास जीवनात अपेक्षित यश नक्की मिळेल असे मत पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले.
  • चिखली येथील संत संताजी सेवा मंडळाच्या वतीने आयो जित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
  • यावेळी व्यासपीठावर पोपट पिंगळे, नितीन पिंगळे, दादा महाराज नाटेकर गुरुकुल शाळेचे मुख्याध्यापक गौतम इंग ळे, प्रसिद्ध सिनेअभिनेते दत्ता उबाळे, किशोर कहाणे,अमि त शिंदे, प्रशांत मोरे उपस्थित होते.
  • यावेळी मिलिंद एकबोटे म्हणाले, आपल्या यशाने आई-वडिलांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू हे विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे बक्षीस आहे.
  • मात्र प्रत्येकाने असे बक्षिस मिळविण्यासाठी आपले मन विचलित करणाऱ्या मोबाईल,टीव्ही पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे असे ते म्हणाले.
  • तसेच विद्येसाठी अविरत परिश्रम,निरंतर अभ्यास आणि चिकाटी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • यावेळी मुख्याध्यापक गौतम इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या आवडीनिवडी,छंद आणि खेळ याकडेही लक्ष द्यावे असे सांगितले.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कहाणे, निलेश पिं गळे, शिवाजी अंबिके, विनीत राऊत, महेश देशमाने, विना यक गाताडे,मनोहर जाधव,अमित कहाणे,विजय येवले, राजेश डोंगरे, अभिषेक शिंदे, हेमंत कहाणे यांनी परिश्रम घेतले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी अंबिके यांनी केले. विद्या र्थी यादीवाचन धनश्री पिंगळे यांनी तर आभार विनीत राऊत यांनी मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles