
करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.भोसले यांनी पत्रकार यांना अपमानास्पद शब्द वापरून केले अपमान ; डॉक्टरांवर निलंबनाची शेख यांनी केली मागणी.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- करमाळा तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार अलीम शेख यांना दिनांक 21 ऑक्टोबर रोजी चार वाजता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेले डॉक्टर महेश भोसले यांनी श्री शेख यांना अपमानास्पद शब्द वाप रून एक प्रकारे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे याचा करमाळा तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
- याबाबतची माहिती अशी की दिनांक 21 ऑक्टोबर रोजी चार वाजता पत्रकार आलिम शेख हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आलेश्वर येथील महिला मंदाताई गौतम ठोसर या साठ वर्षीय महिलेला सर्पदंश झाला होता.

- याची विचारपूस करण्यासाठी श्री.अलीम शेख रुग्णालया त गेले असता त्या ठिकाणी डॉक्टर भोसले हे ड्युटीवर उ पस्थित नव्हते डॉक्टर उपस्थित नसल्याने पत्रकार शेख यांनी डॉक्टर भोसले यांना फोन केला आस्ता आपण दवा खान्यात उपस्थित नाही असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर डॉक्टर भोसले यांनी उलटपणे पत्रकाराला तू आमचा बाप लागून गेला का, आम्हाला हप्ते मागतो का अशा पद्धतीने अपमानास्पद भाषा वापरून एक प्रकारे पत्रकार अलीम शेख याचा अपमान केला आहे.
- सदर घटनेचा तालुका पत्रकार संघटनेने निषेध व्यक्त केला असून संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी होऊन त्वरित निलंबनाची कारवाई करावी.
- अशी मागणी श्री.शेख यांनी माननीय मुख्यमंत्री मुंबई, तसे च मा.आरोग्य मंत्री मुंबई, याशिवाय मा.मंगेश चिवटे मुख्य मंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख, उपसंचालक आरोग्य विभाग पुणे व सिविल सर्जन सोलापूर यांच्याकडे मेल द्वा रे तक्रारी केल्या आहेत.
- एका जबाबदार पत्रकाराला अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक देणाऱ्या डॉक्टर भोसले यांच्यावर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुका पत्रकार संघाने केली आहे.
- संबंधित डॉक्टरला वरिष्ठ अधिकाऱ्याने समज द्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना त्वरित निलंबि त करावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटनेमधून होत आहे.
- चौकट घेणे
- (आमचे सहकारी पत्रकार मित्र अलीम शेख यांना उपजि ल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने अपमानास्पद वागणूक दिली सदरची घटना ही लोकशाहीचा गळा घोटणारी असू न सदर डॉक्टर वर त्वरित कडक कारवाई करावी अन्यथा या विरोधी आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल ) शेख याणी केली मागणी.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










