राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-कोकण कला व शिक्षण विका स संस्था, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जा णाऱ्या “आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार” साठी यंदा ग्रामपं‌ चायत कळसवली (ता.राजापूर, जि. रत्नागिरी) यांची नि वड करण्यात आली आहे.
  • या सन्मानामुळे गावाचा तसेच ग्रामस्थांचा अभिमान दुप्प ट झाला आहे. या पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याचा परिपूर्ण नमुना सादर केला होता.
  • स्वच्छता अभियान, जलव्यवस्थापन, महिला सबलीकरण, शिक्षण, हरित उपक्रम तसेच डिजिटल ग्रामपंचायत या क्षे त्रांमध्ये कलसवली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केलं आहे.
  • पुरस्कार वितरण समारंभात कोकण कला व शिक्षण वि कास संस्थेचे अध्यक्ष श्री.दयानंद कुबल, प्रमुख अतिथी पद्मश्री श्री.मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन) अभिनेता, लेखक, दिग्दर्शक श्री.श्रीनिवास नार्वेकर, सुप्रसिद्ध अभिने ते श्री. अविनाश नारकर, तसेच अनेक सोशल मीडिया रील स्टार उपस्थित होते.
  • या प्रसंगी सरपंच श्री. देवेश गोविंद तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी सौ.सोनाली सतिश आराख व उपसरपंच श्री. जयवंत अर्जुन शेडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • त्यांनी सांगितले की “हा सन्मान संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. त्यांच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते.”
  • विशेष म्हणजे या यशामध्ये ग्रामपंचायत अधिकारी सौ.सो नाली मॅडम यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच कळसवली ग्रामपंचायत ‘आदर्श ग्रामपंचायत’ म्हणून गौरवली गेली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles