
वसई विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचा धक्कादायक कारनामा….! छाटणीच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड – लाकूड विक्रीचा संशय
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- वसई विरार शहर महानगर पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडून झाडांच्या छाट णीच्या नावाखाली मोठ्या व निरोगी फांद्या पद्धतशीरपणे तोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

- ही केवळ देखभाल नसून, योजनाबद्ध वृक्षतोड करत ला कूड विक्रीसाठी वापरण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
- काही भागांमध्ये झाडांची पूर्ण रूपाने तोड केली गेली अ सून, त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या तोडीनंतर लाकूड नेमकं कुठे जाते, याची कोणतीही पारदर्शक माहिती उपलब्ध नाही.

- या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नारायण घाडी यांनी थेट आवाज उठवला असून, “वृक्षछाटणीच्या नावाखाली सुरू असलेली लाकूड तोड ही एक सुनियोजित व्यावसायिक लूट आहे.
- हे कृत्य केवळ नैसर्गिक संपत्तीचं नुकसान नाही, तर जनते च्या विश्वासाला तडा देणारं आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- नारायण घाडी यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी याविरो धात एकजूट होत प्रशासनाकडे सखोल चौकशी व दोषीं वर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
- या प्रकाराकडे वसई विरार महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांनी तात्काळ लक्ष देऊन पारदर्शक चौकशी सुरु करावी, तसेच यामागे असलेल्या लाभार्थ्यांची नावे उघड करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- शहरातील हरित पट्ट्यांचे रक्षण हे प्रशासनाची जबाबदा री असून, अशा प्रकारच्या दुर्लक्षित व नियोजित वृक्षतोडी ला पाठीशी घालणे भविष्यासाठी घातक ठरू शकते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











