
स्काऊट गाईड स्थापना दिवस उत्साहात संपन्न
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल मधील स्काऊट गाईडच्या पथकाने विवि ध उपक्रमांनी स्काऊट गाईड स्थापना दिवस साजरा केला.
- यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड च ळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचे समाजकार्य पुढे नेण्याचा संकल्प केला.

- यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी यमुनानगर मधील विविध छोट्या -मोठ्या दुकानात जाऊन कागदी पिशव्या वाटप करून प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले.
- तसेच यमुनानगर परिसरामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती फेरी काढून पर्यावरण बचतीचा संदेश दिला.

- यावेळी मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा साब ळे यांनी स्काऊट गाईडच्या अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यात चारित्र्य, स्वावलंबन,नेतृत्व व समाजसेवा हे गुण विकसित केले जात असल्याचे सांगितले.
- कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट गाईड प्रमुख आशा कुंजीर तसेच शिवाजी अंबिके यांनी केले.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे, राजीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











