
मॉडर्नच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या जवानांना राख्या.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर, निगडी येथे कारगिल विजय दिनानिमित्ताने प्रेरणादायी व्याख्यान आ णि राख्या सुपूर्द सोहळा उत्साहात पार पडला.
- यावेळी भारतीय संस्कृती संस्था, पुणे चे कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

- “भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्र माचा भाग झाल्या पाहिजेत, जेणेकरून नव्या पिढीला देशसेवेची खरी जाणीव होईल.”
- याप्रसंगी, सीमेवरील जवानांसाठी दरवर्षी राख्या पाठवणा ऱ्या संस्थेचे कार्याध्यक्ष असलेल्या डॉ.नंदकिशोर एकबोटे यांच्याकडे, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रेमाने तयार केलेल्या राख्या सुपूर्द करण्यात आल्या.

- या राख्या डॉ. नंदकिशोर एकबोटे आणि समृद्धी एकबोटे दरवर्षी भारतीय जवानांना पोस्टाद्वारे पाठवतात.
- प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभा ग घेतला, तर स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
- कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.मुख्याध्यापिका शारदा साबळे, मा.पर्यवेक्षक विजय पाचारणे,राजीव कुटे यांची होती.
- सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रुती डौले आणि सर्वेश कस्तुरे यां नी केले. पाहुण्यांचा परिचय खंडू खेडकर यांनी करून दिला.

- कार्यक्रमाचे संयोजन नवेश पाटील,शिवाजी अंबिके, कुसु म पाडळे, वैशाली देसले, गंगाधर सोनवणे, व आशा कुंजी र यांनी समर्थपणे पार पाडले.आभार प्रदर्शन विद्यार्थिनी आर्या जामदार हिने केले.
- या देशभक्तिपर उपक्रमाचे विशेष कौतुक कार्याध्यक्ष प्रा. डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, पुणे म.न.पा. नगरसेविका व सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एक बोटे,नियामक मंडळ सदस्या व उपकार्यवाह प्रा.डॉ. निवेदि ता एकबोटे यांनी केले.

- शाळा समिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंखे आणि व्हिजी टर प्रमोद शिंदे यांनीही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत प्रेरणा दिली.
- हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम आणि कृतज्ञतेची भावना जागवणारा ठरला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











