अकोला बाजारमध्ये बिरसा मुंडा जयंती जल्लोषात, गोंडी डफ व घोषणांनी दुमदुमले वातावरण.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- जय जंगो, जय लिंगो जय आदिवासी,जय बिरसा मुंडा या उत्साहवर्धक घोषणांनी श निवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी संपूर्ण अकोला बा जार गाव दुमदुमून गेले.
  • आदिवासींचे क्रांतीसूर्य, जननायक, वनवासी क्रांतीचे प्रव र्तक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गावात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
  • फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक गोंडी ढोल–डफच्या तालांनी आणि आदिवासी तरुणांच्या दंडार नृत्याने गावाचे वातावरण भारावून गेले.
  • वार्ड क्रमांक ४ येथील बिरसा मुंडा प्रतिष्ठानमध्ये जनतेने एकत्र येऊन उलगुलनाचे प्रणेते बिरसा मुंडा,भारतीय संवि धानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वरा ज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महान आदिवासी योद्धा शामा दादा कोलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
  • बिरसा मुंडा समन्वय समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमा ची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
  • त्यानंतर वाजत–गाज त पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करत गाव करी आ णि आदिवासी बांधवांनी उत्सवाला अनोखा रंग दिला.
  • या कार्यक्रमात केळापूर तालुक्यातील साखरा खुर्द येथील जय पेरसापेन ढेमसा मंडळ या कलावंतांनी सादर केले ल्या दंडार नृत्याने उपस्थितांचे मन मोहून टाकले.
  • ढोल–डफच्या ठेक्यावर सादर झालेला हा पारंपारिक नृ त्यप्रकार गावकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. बिरसा मुंडा हे केवळ आदिवासींचे श्रद्धास्थान नसून स्वातंत्र्यल ढ्याचे एक अद्भुत अध्याय आहेत.
  • १८९५–१९०० दरम्यान त्यांनी उलगुलान चळवळ उभारू न ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले.छोट्या वयातही त्यांनी आदिवासी समाजाला जमीन हक्क, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचे महत्व पटवून दिले.
  • आजही आदिवासी समाज त्यांना धरती आबा म्हणून पूज तो. त्यांच्या १५० व्या जयंतीमुळे या वर्षीचा उत्सव अधि कच भव्य झाला होता.
  • अकोला बाजार ग्रामपंचायत सरपंच योगेश राजूरकर, वड गाव पोलिस स्टेशन ठाणेदार विकास दांडे,संजय शिंदे पा टील,अजय धुरट, प्रेम पवार, हमीद पठाण, राजू मादेश्वर, गणेश मडावी, श्रावण वाघाडे, वैभव जाचक,सचिन कोयरे, प्रविण राठोड, बबन घनकर, अक्षय शेंद्रे,रमण टेकाम, शंक र ठाकरे, दीपक राजूरकर,रामकृष्ण टेकाम,विनोद चांदेक र, देवानंद मडावी,राधेश्याम मडावी, रामदास ठाकरे,ऋषभ टेकाम,मधु सिरसाम, पिंटू टेकाम, प्रतीक उईके, प्रतीक को काटे,निखिल राजूरकर, सौरभ टेकाम यांसह मोठ्या संख्ये ने आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या.
  • गावातील युवक मंडळी, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहू न कार्यक्रमाला खरी शोभा मिळाली.फटाके, दंडार, डफची साथ, घोषणांचा जल्लोष आणि आदिवासी परंपरेची झल क या सर्वांनी मिळून एक अविस्मरणीय वातावरण तयार झाले.
  • जयंती सोहळ्याने आदिवासी ऐक्य, संस्कृती आणि संघर्ष गाथेचा नवा उत्साह गावात निर्माण केला.
  • या कार्यक्रमासाठी वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार वि कास दांडे यांच्या नेतृत्वाखाली एएसआय गणेश आगे,  पो लिस कॉन्स्टेबल शिवाजी शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles