मुसळधार पावसामुळे तिसऱ्यांदा संगोबा पुलावरून पाणी, तरटगाव चा बंधारा फुटून पाणी शेतकऱ्यांच्या शेतात.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- शनिवारी प हाटे मुसळधार पावसामुळे सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली जेऊरगावात ओढ्याचे पाणी घराघरात शिर ल्याने वृद्ध व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
  • दहिगाव येथील शेळके वस्ती व शेटफळ गावापासून लबडे वस्ती पासून जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या उड्यावरील पूल वाहून गेल्याने या परिसराचा काही काळ संपर्क तुटला.
  •  

  • मुसळधार पावसामुळे कुंभेज वीट मासेवाडी मागितला ओवरफुल झाले.
  • घारगावच्या तलावास धोका निर्माण झाला आहे सीना न दीच्या पाणीपातळी वाढ झाल्याने नदी काठावरील बोरगा व निलज २०० ग्रामस्थांना संभाव्य पुराचा दुखा लक्षात घेऊन प्रशासनाने एसटी बसने महामुनी मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केले आहे.
  • जेऊर येथील वडाचे पाणी खंडोबा मंदिर पोलीस चौकी भारत महाविद्यालय व बायपास रोड वरील नागरी वस्तीत शिरल्याने अनेक घरात पाणी शिरले आणि ग्रामस्थांची धावपळ उडाली.
  • जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकांना गराबाहेर काढून जेसीबी द्वारे सुरक्षित स्थळी हलवले.
  •  

  • सीना नदीत नांदणी व कांडोळा नदीचे पाणी मोठ्या प्रमा णात मिसळत आहे याशिवाय बीड जिल्ह्यातील आष्टी कडा व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
  • तालुक्यातील गुळसडी केंकडे जाणाऱ्या पांडे वडाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपारपर्यंत वाहतूक बंद पडली होती.
  • दहिगाव शेटफळ शिवारात उड्यांना मोठ्या प्रमाणात पा णी आल्याने दोन्ही ठिकाणचे फुल वाहून गेले लोखंडे व स्ती परिसरात राहणाऱ्या 200 पेक्षा जास्त लोकांचा दहि गाव शेटफळ या दोन्ही बाजूंकडून संपर्क तुटला.
  • या परिसरात तील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला जरी पोपळज उंब्रज रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles