
येळवणच्या विद्या निकेतन हायस्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांची तब्बल 37 वर्षानंतर भेट.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- सन १९८८ चा इय त्ता १० वीचा वर्ग पुन्हा एकदा जुन्या आठवणीना उजाळा देत मुंबईच्या दादर मधल्या वीर कोतवाल उद्यानात शनि वार दि २९ नोव्हेंबर २०२५ रोजी एकवटला होता.
- राजापूर तालुक्यातील विद्या निकेतन येळवण शाळेच्या १९८८ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल तीन दश के सात वर्षांनी म्हणजे ३७ वर्षांनी एकत्र आले होती.
- त्या काळातील गुलाबी रंगातील मौज मजा काही वेगळीच होती. खेळणं, कुदणं आणि एकमेकांशी मस्करी करणं हा स्थायीभाव होता.

- विद्या निकेतन येळवण ही शाळा ग्रामीण भागातील निसर्ग रम्य अशा परिसरात आहे.
- या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण महर्षी चंद्रकांत देशपांडे (भाई ) याचे संस्कार झाल्याने आम्ही घडलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.
- तर शाळेतील अन्य शिक्षक शिक्षिका याचेही आठवण कर ण्यात आली. काही शिक्षक आज हयात नाहीत. त्यांचेही स्मरण करण्यात आले.
- आता मात्र परिस्थितीत खुप बदल झाला आहे. वर्गातल्या मुलींची लग्नानंतर नावे बदलली त्यांना मुले, नातवंडे झाली.
- वर्गातली मुलेही खुप बदललेली अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात नसलेले मित्र मैत्रिणी एकत्र आले होते. सर्वांच्या च चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता.
- प्रत्येकाने आपापले अनुभव सांगताना जुन्या आठवणीना पुन्हा एकदा उजाळा दिला. कोकणातील खेडेगावात अस लेली विद्या निकेतन येळवण ही शाळा डोळ्या समोर आ णताना खुप आनंद वाटत होता.
- रोज पाच किलो मीटर अंतर पायी चालून एकही खाडा न करणाऱ्या विध्यार्थ्यानी आता पन्नाशी पार केली असली तरी पूर्वीच्याच जोशात सर्वजण बोलत होते.
- काही विद्यार्थी या जगात नाही आहेत. त्यांना सर्वप्रथम भा वपूर्ण मूक श्रद्धांजली सर्वांनी वाहिली. तेव्हा सर्वच जण भावुक झाली होते.
- काही मित्र मैत्रिणी ग्रामीण ठिकाणी आपला उदरनिर्वाह करीत असल्याने ते येऊ शकले नाहीत तर काही मुंबई व मुंबई बाहेर असल्याने त्यांना येणे शक्य झाले नाही.
- मात्र जे विद्यार्थी आले त्यांनी आपले मन मोकळे केले.एक दुसऱ्यांची सुखं दुःख जाणून घेतली. या पुढील काळात एकमेकांना सहकार्य कारण्याच्या उदात्त भावना व्यक्त झाल्या.

- या गप्पामध्ये रममान झालेले विध्यार्थांमध्ये चिपळूण मधी ल ग्रामसेवक मंगेश पांचाळ, हनुमान मालप, चंद्रशेखर जा धव (पत्रकार ) विकास लाड,अंजली कामतेकर, सुवर्णा शेट्टे, सुरेखा लाड, सुरेश माटल, वसंत बने, विठोबा पराड कर,अनंत शेट्टे, वामन तानवडे, दीपक रोडे यांची उपस्थिती होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











