
पूरग्रस्तांच्या जीवनात ‘खर्ड्याचा गोडवा….! दिवाळीपूर्वीच मिळाली दिवाळीची ‘आपुलकीची’ भेट.
- प्रतिनिधी : परंडा फारूक शेख :- दि.१५ ऑक्टोबर नु कत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालु क्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना, खर्डा येथील ग्रामस्थांनी ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
- ‘आपुलकीचा फराळ’ या उपक्रमांतर्गत खर्डा व पंचक्रोशी तील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळाचे बॉ क्स परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले.
- दि. १५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, परंडा येथे तह सीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते काही पूरग्रस्तांना फराळ किटचे वाटप करण्यात आले.
- उर्वरित फराळाचे बॉक्स परंडा तालुक्यातील पत्रकार संघ टनांच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले.

- यावेळी तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पू जा गोरे, पुरवठा निरीक्षक मिलिंद पारळे, सहायक महसूल अधिकारी नितीन भांडवलकर,आशिष ठाकूर, तसेच खर्डा शहराचे माजी सरपंच शिवकुमार गुळवे, सरपंच संजय गो पाळघरे, ग्रामपंचायत सदस्य व भाजपा शहराध्यक्ष महेश दिंडोरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, सा माजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, नवनाथ चौधार यांच्या सह परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
- फराळ तयार करण्यासाठी खर्डा येथील सीताराम गड, रय त शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालय, तसे च पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम घेतले.

- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्डा ग्रामस्थांनी दाखवलेला हा ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ आणि ‘शेतकऱ्यांची बांधिलकी’ राज्यातील माणुसकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
- दिवाळीपूर्वीच पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल खर्डा ग्राम स्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











