
ओमकार कुणबी जनसेवा मंडळाच्या वतीने साहित्य संघ मंदिर मुंबई येथे “आता उठवू सारे रान” या नाटकाचे आयोजन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दापोली तालुक्यातील साकुर्डे जगदाळेवाडी येथील ओमकार कुणबी जनसेवा मं डळ (रजि.) यांच्या वतीने “आता उठवू सारे रान” या नाट काचे आयोजन रविवार दि.१४ डिसेंबर,२०२५ रोजी दुपा री ३.३० वाजता गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे करण्यात आले आहे.

- गेली २६ वर्षे ओमकार कुणबी जनसेवा मंडळ यशस्वीपणे काम करत असून वाडीच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध विकासकामे करण्यासाठी आर्थिक निधी संकलना साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्या ची माहिती मंडळाचे सचिव उमेश जगदाळे यांनी दिली.
- “आता उठवू सारे रान” हे नाटक कोकणातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य आहे.
- मंडणगड तालुक्याचे सुपुत्र सुनिल माळी हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असून अत्यंत उत्तम पद्धतीने अने क विषय यामध्ये हाताळले गेले आहेत.
- जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











