
भाजपा परांडा तालुका अल्पसंख्यांक मोर्चा आघाडीच्या अध्यक्षपदी फारूख मुलाणी यांची निवड.
- प्रतिनिधी : करमाळा : फारूख मुलानी:- धाराशिव जि ल्ह्यातील परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा कार्यकर्ते फारूख बाशामिया मुलाणी यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी तालुका अल्पसंख्यांक मोर्चा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

- सदरची निवड भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुका अध्य क्ष अरविंद रगडे यांनी केली आहे.
- भारतीय जनता पार्टी चे अल्पसंख्यांक युवा आघाडीचे नव निर्वाचित अध्यक्ष श्री मुलाणी हे गेली कित्येक वर्षापासून परंडा तालुका भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून ते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
- अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासा ठी मी सदैव तत्पर असून आमचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजित ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मी परंडा तालुक्यामध्ये अल्पसंख्यांकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याची माहि ती भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष श्री फारूक मुलाणी यांनी बोलताना माहिती दिली.

- त्याच्या निवडीचे माजी आमदार सुजित ठाकूर तसेच भा जपाचे परंडा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे तसेच खरसडे व कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









