लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनी विरोधात कोकणवासीयांनी एकत्र यावे ; मनसे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांचे आव्हान.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- इटलीतील ज्या कंपनी मुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले होते, मानव जातीवर दुष्परिणाम झाले होते.
  • तिची यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आता रत्नागिरी जिल्ह्या तील लोटे एमआयडीसी (खेड) मध्ये वापरले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे.
  • इटलीतील ‘मिटेनी’ (Miteni S.p.A) ही कंपनी प्रदूषणा च्या गंभीर आरोपांमुळे २०१८ मध्ये बंद पडली होती.
  • या कंपनीची मशिनरी आणि पेटंट्स भारतीय कंपनी ल क्ष्मी ऑरगॅनिक्स (Laxmi Organic Industries) च्या एका उपकंपनीने खरेदी केल्याचे सांगितले जाते.
  • इटलीमध्ये या कंपनीने PFAS (Per- and polyfluoro alkyl substances) या रसायनांची निर्मिती केली होती.
  • या रसायनांना ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणतात कारण ती निसर्गात कधीही नष्ट होत नाहीत.
  • या केमिकलमुळे येणाऱ्या पिढीवर खूप परिणाम होईल आणि त्यांचे आयुर्मान केवळ ३० ते ४० वर्ष असू शकते.
  • लोटे एमआयडीसी मधील अनेक कंपन्या ह्या केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांवर आणि पर्याव रणावर परिमाण झाल्याचे दिसून आले आहे.
  • लोटे परशुराम येथील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक्स’च्या प्रकल्पात (Yellowstone Fine Chemicals) या मशिनरीद्वारे उत्पादन सुरू झाल्याच्या बातम्या नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • या रसायनांमुळे कर्करोग, यकृताचे आजार आणि हार्मोन ल असंतुलन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • कोकणातील पर्यावरणावर आणि लोकांच्या आरोग्यावर याचे परिणाम होऊ शकतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • इटलीतील ‘मिटेनी’ (Miteni) ही कंपनी PFAS (Per- and polyfluoroalkyl substances) नावाच्या रसायनांचे उत्पादन करत होती.
  • या रसायनांना ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणतात, कारण ती निसर्गात किंवा मानवी शरीरात कधीही पूर्णपणे नष्ट होत नाहीत.
  • या कंपनीने इटलीतील ‘व्हेनेटो’ प्रांतातील सुमारे ३.५ ला ख लोकांचे पिण्याचे पाणी दूषित केले होते.
  • तिथल्या लोकांच्या रक्तामध्ये या विषारी रसायनांचे प्रमाण खूप जास्त आढळले असून त्याचा संबंध कर्करोग, वंध्यत्व आणि हृदयरोगाशी जोडला गेला आहे.
  • भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स (Laxmi Organic Industries) ने २०१९ मध्ये एका लिलावाद्वारे मिटेनी कंपनीची सर्व मशिनरी, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केले. लोटे परशुराम एमआयडीसी आधीच प्रदूषणाच्या समस्यांशी झुंजत आहे.
  • या नवीन प्रकल्पामुळे वशिष्टी नदी आणि परिसरातील भू गर्भातील पाणी कायमचे दूषित होण्याची भीती पर्यावरण वादी व्यक्त करत आहेत.
  • या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजुबाजूचा गावा तील ग्रामस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला पाहिजे.
  • ही रसायने मानवी शरीरातील रक्तामध्ये साठून राहतात यामुळे किडनी कॅन्सर,थायरॉईडचे आजार, गरोदर महिलां मध्ये समस्या आणि लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीवर गंभीर परिणाम होतात.
  • परशूराम भूमी ही देवभूमी म्हणून ओळखले जाते आता ती विषारी भूमी बनत आहे.
  • परशुराम भूमी वाचवण्यासाठी कोकणवासीयांनी आवाज उठवला पाहिजे असे आवाहन मनसे माजी तालुकाध्यक्ष आणि समाजसेवक संदीप फडकले यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles