
बावची विद्यालय, परंडा च्या विद्यार्थ्यांनी दिली परंडा पोलीस स्टेशनला भेट.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- रेझिंग डेच्या निमित्ताने बाव ची विद्यालय, परंडा यांच्या वतीने परंडा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट देण्यात आली.
- या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची कार्यप द्धती प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळावी हा होता.
- या प्रसंगी परंडा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. प्रवीण सिर सट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

- त्यांनी पोलीस स्टेशनमधील विविध विभाग, शस्त्रसाठा, त सेच प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका व कामकाज याबाबत सविस्तर माहिती दिली.
- विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारून पोलीस दलाच्या कार्याबाबत अधिक जाणून घेतले. या शैक्षणिक भेटीसाठी इयत्ता ९वीचे सुमारे १०७ विद्यार्थी उपस्थित होते.
- शाळेच्या वतीने श्री. सचिन मोरे, विकास वाघमारे, शुभम रोडगे, सुशांत गरड तसेच अर्चना हावळे मॅडम व ऋतुजा गायकवाड मॅडम हे शिक्षक सोबत होते.
- विद्यालयच्या वतीने कु. आलिया पठाण, कु यश मोरे व विकास वाघमारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व गृह विभागाचे आभार मानले.
- ही भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली असून, कायदा व सु व्यवस्था राखण्यात पोलीस दलाची भूमिका समजून घे ण्यास मदत झाली, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











