
राजापूर तालुक्यातील तळवडे येथे आज भव्य मोफत आरोग्य शिबीर : ॲड.अपूर्वा ताई सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- प्रतिनिधी : पाचल :-प्रमोद तरळ :- सिध्दीविनायक हाॅ स्पीटल कोल्हापूर आणि अपूर्वा किरण सामंत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र करक-कार वली उपकेंद्र तळवडे येथे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २० २६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

- या शिबीराचे उद्घाटन शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्या ॲड अपूर्वाताई सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
- सिध्दीविनायक हाॅस्पीटल चे हृदयविकार विशेष तज्ञ डॉ चंद्रकांत पाटील रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन कर णार आहेत.
- या शिबीरात ब्लड शुगर, शारीरिक तपासणी, तज्ञ डॉक्टरां चा सल्ला, आवश्यक औषधे तसेच हृदयविकार, मधुमेह, छातीत धडधड व दुखणे,धाप लागणे, हाता पायाला मुंग्या, गोळे येणे, आदींची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
- तरी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अपूर्वा किरण सामंत फाऊंडेशनच्या वतीने सुरेश ऐनारकर, संदीप बारस कर, युवराज मोरे, सोनू पाथरे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











