
पाल्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकाबरोबर तेवडी पालकांची देखील आहे : मौलाना सौदागर.
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- शालेय जीवनात वि द्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवा महेदविया उर्दु शाळेत बक्षीस वितरण प्रसंगी मौलाना काझी यांनी सांगीतले.
- परंडा येथील महेदविया उर्दू प्रा शाळेत ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर स्प र्धा घेण्यात आल्या होत्या.
- या स्पर्धेतील विजेत्या पाच विद्यार्थिनींना हाजी सत्तार शे ख,मौलाना जफर काजी, मौलाना सकलेन सौदागर, बिला ल मौलाना, रिजाय सिकलकर, इम्रान सौदागर, बाशाभाई शहाबर्फीवाले, मुस्ताक चौधरी मौलाना, जमील शेख यां च्या हस्ते रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्या त आले.

- या कार्यक्रमात बोलताना मौलाना जफर काजी म्हणाले की सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईलची फार आवड निर्माण होत चालली आहे.
- पाल्यांची बौद्धिक क्षमता वाढीसाठी त्यांना मोबाईल पासू न दूर ठेवावे असे मत व्यक्त केले. तर आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकां बरोबर पालकांची देखील आहे असे मत मौलाना सौदागर यांनी व्यक्त केले.
- महेदविया प्रा शाळेत दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी प्रे षीत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र जीवनकार्य, आदर्श आ चार-विचार, सत्य, संयम, दया व मानवतेच्या संदेशावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.
- या स्पर्धेत शाळेतील २१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हो ता. स्पर्धेत प्रथम शेख अलीना शहाजान ( ७००० ) रुपये, दुतीय बहिरे हिबा गौसपाशा ( ५००० ) रुपये, तृतीय हन्नुरे जारा गाजीबक्ष ( ३000 ) रुपये, चौथी बागवान सबा वसी म (१५००) रुपये,पाचवी शिकलकर सबा कलीम ( ११०० ) रुपये, रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
- या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात मोहम्मद पैगं बर यांचे चांगले विचार,संस्कार, आत्मसात करता यावा हा त्यामागचा हेतु आहे.
- या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभा ग घेतला होता. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासा ठी व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी संस्थेचे स चिव अब्दुल मुजीब पटेल यांच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन पर गिफ्ट देण्यात आले.
- यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका सय्यद आसीयाबेगम मु स्ताक हुसेन, सहशिक्षक हरून शेरीकर, जमीर शेख, सादि क शेख, जागीरदार निहाल अहेमद यांच्यासह पालक वि द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कार्यक्रमात प्रास्ताविक जमीर शेख यांनी तर सूत्रसंचलन इलियास शेख यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











