वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांनी सन्मानित.

  • प्रतिनिधी : वाटूळ : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाटुळ प्रशा लेतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे आदर्श पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
  • विद्या विकास मंडळ मुंबईचे दिवंगत उपाध्यक्ष ह.भ.प. सु भाष विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ शाळेचा माजी विद्या र्थी विराज विलास चव्हाण यांच्या संकल्पनेतून २०१६ पा सून सदर पुरस्कारांचा प्रारंभ झाला.
  • मागील दहा वर्ष शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मुलांमधून एक व मुलींमधून एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात, वर्षभर मुलाने केलेल्या वर्तनाचे परीक्षण करून प्रजासत्ता क दिनी पुरस्कारांचे वितरण केले जाते.
  • यावर्षी इयत्ता दहावी मधील आशिष अनिल गोबरे याला मुलांमधून तर शुभ्रा प्रसन्न खांबे हिला मुलींमधून पुरस्कार देण्यात आला.
  • यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण, व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा वर्षा चव्हाण, माजी संचालक गणपत वळंजू, शालेय समिती सदस्य नारायण चव्हाण, बाळकृष्ण वळंजू, माजी विद्यार्थी संतोष ( बंदू ) चव्हाण, प्रसन्न खांबे, कैलास चव्हाण, मंदार पांचाळ, विराज हांदे, रसिक पेणकर ग्रामपं चायत सदस्य प्रियांका भुर्के, ओमकार चव्हाण, पालक शि क्षक संघटनेच्या उर्मिला यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles