दूधाना येथे पोलिसांची हातभट्टी दारूवर मोठी धाड,एक लाखांहून अधिक किंमतीचा सडवा जप्त.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- वडगाव (जं) पोलिस ठाण्या च्या हद्दीतील दूधाना (वाकी) येथे अवैध हातभट्टी दारू नि र्मितीवर बुधवारी सकाळी वडगाव पोलिसांनी मोठी कार वाई केली.
  • या धाडीत एक लाख तीन हजार सातशे रुपयांचा मोहाचा सडवा जप्त करण्यात आला असून,तिघांवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
  • ठाणेदार विकास दांडे यांना शेतशिवारात अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळा ल्यानंतर त्यांनी सकाळी आपल्या पथकासह दूधाना परि सरात धाड टाकली.
  • शेतशिवारात तपासणी करताना मोठ्या प्रमाणात लोखंडी पिपे व प्लास्टिक ड्रममध्ये मोहाचा सडवा तयार स्थितीत आढळून आला.
  • या कारवाईदरम्यान आरोपी विलास भीमराव टेकाम (वय ५५,रा. दूधाना) यांच्या ताब्यातून ७६ लोखंडी पिप्यात भर लेले एकूण १०६४लिटर मोहाचा सडवा, किंमत अंदाजे रुपये ५३२००/-, तसेच आरोपी केशव सखाराम टेकाम (वय ५२,रा.दूधाना) यांच्या ताब्यातून १५ लोखंडी पिप्या तील २१०लिटर सडवा, किंमत रुपये १०५००/- असा मुद्देमाल मिळून आला.
  • तसेच आरोपी रामा कृष्णा अत्राम (वय ५५,रा.दूधाना) यां च्या ताब्यातून ४ प्लास्टिक ड्रममधील ८००लिटर मोहाचा सडवा,किंमत रुपये४००००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • या तिन्ही आरोपींकडून मिळालेला एकूण २०७४ लिटर मोहाचा सडवा,किंमत रुपये १०३७००/- एवढा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
  • या प्रकरणी वडगाव (जं) पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबं दी अधिनियम अंतर्गत स्वतंत्र तीन गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
  • ही धाड पोलिस ठाणेदार विकास दांडे यांच्या नेतृत्वाखाली ए एस आय फुलके, धर्मेंद्र मेश्राम, अविनाश खाडे, पुकार वाकोडे व इतर पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने केली.
  • पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles