
शहापूर कोठारे घाटात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बस अडकली; रस्त्यांची दुरवस्था, भ्रष्टाचार आणि भंगार गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला.
- प्रतिनिधी : शहापूर : हिराजी देसले :- शहापूर तालुक्या तील कोठारे घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या(एसटी) निष्काळजीपणाची आणि रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाची भीष ण मालिका सुरूच आहे.
- काल ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात होऊन १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा याच घाटा त नादुरुस्त एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन अडक ल्याची संतापजनक घटना घडली.

- वारंवार तक्रारी करूनही आगार प्रशासनाकडून जुनाट आ णि खिळखिळ्या बसेस पाठवल्या जात असल्याने स्थानि कांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
- खड्डे, वाढलेली झाडी आणि भ्रष्टाचाराचे साम्राज्य पठारी व घाटाच्या चढ-उतारावर रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचा र झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
- अवघ्या काही दिवसांत रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
- त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत आ णि रानटी झाडीझुडपांचे प्रचंड साम्राज्य पसरले असून रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.
- वळणांवर समोरील वाहने दिसत नसल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
- कामगार व विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
- या ग्रामीण व दुर्गम भागातून दररोज शेकडो कामगार, व्या वसायिक आणि तरुण वर्ग शहापूर-भिवंडी परिसरात उदर निर्वाहासाठी जातात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी याच बसेसवर अवलंबून आहेत.
- मात्र, प्रशासनाकडून दररोज नादुरुस्त गाड्या पाठवून या शेकडो प्रवाशांच्या जिवाशी थेट जुगार खेळला जात आहे.
- आमदारांच्याच भागात ‘वेटा’ आदिवासी पाडा स्वातंत्र्या पासून रस्त्यापासून वंचित
- अत्यंत खेदजनक बाब म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींच्याच प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ‘वेटा’ सारख्या आदिवासी गावाला स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही अद्याप पक्का रस्ता मिळालेला नाही.
- येथील नागरिकांना आजारी रुग्ण, गरोदर माता आणि वृद्धांना उपचारासाठी आजही डोली करून पायपीट करत न्यावे लागत असून मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे.
- तीव्र आंदोलनाचा इशारा
- वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे ग्रामस्थ आणि प्रवाशां चा संयम सुटला आहे.

- कोठारे घाटातील रस्त्यांचे तत्काळ ऑडिट करून दुरुस्ती करावी, वाढलेली झाडी तोडावीत, मार्गावर सुस्थितीतील बसेस सुरू कराव्यात आणि वेटा गावाच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा शहापूर आगार आणि तह सील कार्यालयावर तीव्र लोकशाही मार्गाने ‘रस्ता रोको’ व ‘ठिय्या आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थ, कामगार व विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






