
बाप्पा मोरया ओणी संघाने कोरले राजापूर चॅम्पियन ट्रॉफीवर नाव उपविजेता ठरला गांगेश्वर क्रिकेट संघ हातीवले.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर युवा प्रति ष्ठान (रजि) मंडळ आयोजित राजापूर चॅम्पियन ट्रॉफी पर्व ८ वे उत्साहात संपन्न झाले.
- अध्यक्ष श्री.सुनिल मासये यांच्या नेतृत्वाखाली व सचिन पुजारे तसेच उन्हाळे गावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उप रोक्त मंडळाच्या वतीने दि.२४ /२५ जानेवारी २०२६ रोजी महालक्ष्मी मैदान उन्हाळे येथे राजापूर चॅम्पियन ट्रॉफी पर्व ८ वे चे आयोजन करण्यात आलें होते.

- स्पर्धेत २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सहभा गी सर्व संघांना मनापासून धन्यवाद देण्यात आले हि क्रिके ट स्पर्धा कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ धुमाळवाडी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
- या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो बाप्पा मोर या ओणी संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ हातीवले उपवि जेता संघ ठरला विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांचे राजापूर युवा प्रतिष्ठान (रजि.) मंडळा कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
- या स्पर्धेतील तृतीय क्रमांकवर समाधान मानावे लागले ते महालक्ष्मी उन्हाळे संघाला. या स्पर्धेतील मालिकावीर ठर ला बाप्पा मोरया ओणी संघाचा महेश भाबळे,उत्कृष्ट गोलं दाज महालक्ष्मी उन्हाळे संघाचा पार्थ तिर्लोटकर आणि उ त्कृष्ट फलंदाज बाप्पा मोरया ओणी संघाचा महेश भाबळे वरिष्ठ खेळाडूचा मानकरी पुरस्काराने हातीवले संघातील महेश गोटम यास गौरवण्यात आलें.
- स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे तसेच मंडळातील सर्व सभासद, पदाधिकारी यांनी मंडळाला विशेष सहकार्य केले त्यांच्या बद्दल मंडळाने शतशः ऋणी व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











