राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील क्रिके ट प्रेमींसाठी उत्साहाची प्रेरणा ठरलेली राजापूर क्रिकेट स मिती आयोजित तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या वरची पेठ येथील राजीव गांधी मैदानावर मोठ्या जल्लोषा त पार पडली.
  • या स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर या संघाने उत्कृष्ट कामगि री करत प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक चॅम्पिय न्स भालावली तर निनादेवी डोंगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
  • स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारामध्ये भालावलीच्या निवृत्ती भोसले यांना मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • धोपेश्वरच्या वैभव मांजलकर याला उत्कृष्ट फलंदाज, देवेंद्र कदम उत्कृष्ट गोलंदाज तर हर्षद चापडे याला उत्कृष्ट क्षेत्रर क्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला ५१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाला २५ हजार १११ रुपये व‌ तृतीय क्रमांक विजेत्याला ५ हजार १११ रुपये व चषक देण्यात आले.
  • स्पर्धेचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
  • यावेळी समितीचे सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र नागरेकर, कब्बडी फेडरेशनचे मोहन पाडावे, राजापूर पत्र कार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, महेश नकाशे, योगेश नकाशे, संतोष तांबे, अरविंद लांजेकर, नगरसेवक दिलीप अमरे, सुभाष नवाळे,ॲड प्रविण नार्वेकर आदी उपस्थित होते.
  • स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजापूर क्रिकेट समितीचे पदा धिकारी महेश गोंडाळ, प्रशांत नागरेकर, अमित चंदूरकर, अरविंद ‌लिगम, राजेश जोशी, सचिन राऊत, सुधीर तेरवण कर, अरविंद लांजेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
  • सामन्यामध्ये पंच म्हणून मंगेश ढवळे,ऋषी अमरे व भाई गाडगीळ यांनी जबाबदारी सांभाळली तर समालोचन रमे श चव्हाण, नरेंद्र कामतेकर व श्री लांजेकर यांनी केले.
  • स्पर्धेला अपूर्वा सामंत,प्रकाश कुवळेकर,अनिल भुवड, जि तेंद्र खामकर, नगरसेवक दिलीप चव्हाण, साफिया काझी, सौरभ पेणकर, सौ.प्रेरणा नार्वेकर,सुयोगा जठार तसेच म हेश नकाशे आदींनी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles