अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होतेः सुषमा अंधारेंचे सुनेत्रा पवारांना पत्र; दोन नेत्यांचा उल्लेख करत दिला सावधगिरीचा इशारा.

  • प्रतिनिधी : पुणे : संदीप कारके :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सा वरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत वेगाने राज कीय हालचालींना वेग आला आहे.
  • अजित पवारांच्या निधनाला अवघे तीनच दिवस झाले अ सताना, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  • थोड्याच वेळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले असून, या घडामोडींवर आ ता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे.
  • अजित पवार यांच्या पार्थिवावर २९ जानेवारी रोजी अंत्य संस्कार झाले. मात्र, त्याच दिवसापासून त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाल्याबद्दल सुषमा अंधारे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
  • राजकारणातील ही वेगवान ‘वारसा’ निवड आणि त्यामा गील परिस्थितीवर त्यांनी बोट ठेवले आहे.
  • सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दोन ज्येष्ठ ने त्यांच्या नावांचा उल्लेख करत सुनेत्रा पवार यांना सत्तेच्या वर्तुळातील ‘झारीतील शुक्राचार्यापासून सावध राहण्याचा गंभीर सल्ला दिला आहे.
  • तसेच सुनेत्रा पवार यांच्यावर आलेल्या जबाबदारीची तुल ना करताना अंधारे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा दाखला दिला.
  • सुषमा अंधारे यांचे पत्र जशास तसे… प्रिय सुनेत्रा वहिनी आपण खूप कमी वेळा भेटलोय, पण जेव्हा कधी भेटलोय अगदी मनापासून, दादांची आणि माझी असंख्य वेळा भेट झाली पण मी दादांसोबत एकदाही आवर्जून फोटो काढ ला नाही.
  • चांगल्या लोकांसोबत आपण फोटो काढायला हवेत ते आ पण का काढत नाहीत याबद्दल पहिल्यांदाच पश्चाताप वाट तेय, 28 तारखेला दादांच्या बाबत जे काही झालं ते अक ल्पित होतं.
  • शत्रूवरही अशी वाईट वेळ येऊ नये ती आपल्यावर येऊन ठेपली. अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागातल्या एका खाटेवर दादांचे निष्याण कलेवर निपचित पडले होते.
  • पार्थ दादा (आता तोच आमच्यासाठी दादा) प्रत्येकाला आत न येण्याची विनवणी करत होते मात्र गर्दीला आवर घालणं अशक्य होतं.
  • मी फार घायकुतीला येऊन पार्थ दादाला विनंती केली. आ णि ते मला दादा आहेत त्या खाटेपर्यंत घेऊन गेले. आत तुम्ही उभ्या होतात, शांत.. सुन्न… बधिर….
  • त्यानंतर बाजूच्याच खोलीत उदयनराजे, जयंत पाटील, प्रफुल पटेल या सगळ्यांच्या समवेत बसलेले पवार साहेब दिसले. मी वाकून नमस्कार केला. बाहेर पडले आणि पु न्हा आपण बसलेल्या बाजूच्या खोलीत येऊन थांबले.
  • तब्बल अडीच तास त्या खोलीत तुम्हाला प्रत्येक माणूस येऊन भेटत होता. विठ्ठल मणियार काकर, उदयनराजे, अ संख्य आमदार, दादांचे स्वीय सहाय्यक ढिकले, दादांचे अंगरक्षक…
  • सगळ्यात शेवटी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला अन त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री… कुणाशी च भेटताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. तुम्ही तितक्याच शांत.. स्थितप्रज्ञ बसून होतात.
  • तुम्हाला न्याहाळत असताना नियती इतका मोठा अन्याय कसा करू शकते असं वाटून वारंवार हुंदके दाटून येत होते.
  • पण तुमच्यासमोर रडायचं नाही असं द टावल्यामुळे गपगु मान आवंढा गिळून होते. अन मग तुम्हीच आपुलकीच्या ओलाव्याने हाक मारली.
  • मी जवळ जवळ झेपावले. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रड ले. या दुःखातून तुम्ही कशा सावराल असा विचार करत होते.
  • पण 29ला दादांचा अंत्यविधी होता होता दादांच्या राजकी य वारसदाराची चर्चा सुरू झाली.
  • काय आश्चर्य आहे, दादा सारख्या अत्यंत कर्तृत्वान निर्णय क्षमता असणाऱ्या आणि प्रचंड दूरदृष्टीच्या कामाचा आवा का असणाऱ्या माणसाची उणीव कुणीही भरून काढू श कणार नाही असं म्हणणारे भलेभले मातब्बर नेते दादाची उणीव भरून काढण्यासाठी वायुवेगाने कामाला लागले..!!
  • माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळं आकलना च्या पलीकडचं आहे. म्हटलं तर है अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे.
  • चिता अजून पड शांतही झाली नाही. मृत्यूला उणेपुरे ४८ तास उलटले नाहीत तोच राजकीय समीकरणांची जुळवा जुळव हे माणसाच्या नश्वरतेथे आणि त्याच्या क्षणभंगुरते चे प्रमाण आहे.
  • वहिनी, समाज माध्यमांवर काही लोक आपल्याकडे बघून “Brutus you too” अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
  • बाजूने आणि विरोधात लिहिलेली मते मतांतरे वाचणे आ णि हळहळणे याच्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात तसेही फार काही नाही.
  • पण वहिनी मला मात्र वेगळे वाटतंय.खरंतर अखंड महारा ष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आप ल्याला मिळत आहे.
  • याचा आनंद नक्कीच आहे. पण या आनंदाला कर्तृत्ववान दादा गमावलेल्या दुःखाची झालर आहे.
  • वहिनी, खरंतर तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून होत असलेला आजचा शपथविधी हा भावनिक दृष्टिकोनातून चूक वाटत असला तरी दादांनी स्वकर्तृत्वाने जे अफाट साम्राज्य उभं केलं त्यावर कुठल्याही गिधाडांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला पाऊल उचलणे गरजेचेच आहे…!
  • मल्हार होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर पती निधनाचे दुःख करण्यापेक्षा माळवा प्रांताचे शासक म्हणून उभे राहणे महानायीका अहिल्यादेवी होळकरांच्या साठी क्रमप्राप्त होते.
  • माळव्याचे आतले आणि बाहेरचे शत्रू कोण आहेत आणि ते कोणत्या स्तराला जाऊन क्षती पोहोचू शकतात याची कल्पना अहिल्यादेवींना फार चांगल्या पद्धतीने होते.
  • त्यामुळे सांप्रत प्रथा-परंपरांना फाटा देत त्या धीराने कंबर कसून उभ्या राहिल्या आणि आपल्या सासऱ्याने आणि पतीने उभे केलेले साम्राज्य वाचवण्यासाठी प्राणपणाने लढल्या.
  • वहिनी, तुम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतोय, वरवर तो कूर वाटतोय, मात्र त्याची कारण लक्षात येत आहेत.
  • दहा दिवस थांबलो असतो तर काय फरक पडला असता.. ? असं दादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला वाटत आहे.
  • पण फरक पडला असता..! कदाचित दादांचा राजकीय वा रसदार कोण ही चर्चा सुरू झाली नसती तर अजूनही दा दांचा अपघात घातपात कसा आहे? यावर लोक खल कर त राहिले असते…!
  • कदाचित माध्यमांनी पुढचे तीन-चार दिवस दादांच्या जु न्या मुलाखती.. दादांनी कुणाला कशी कशी मदत केली याचे किस्से.. दादांच्या सहवासातील काही महत्त्वाच्या लो कांच्या मुलाखती… दादांनी उभे केलेले उद्योग.. MIDC..
  • औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग….. बारामती नंतर पिंपरी चिंचवड मध्ये निर्माण केलेले रस्ते वाहतूक व्यवस्था त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प यावर माध्यमांनी चर्चा केली असती…!
  • अशा चर्चेतून कदाचित दादांचं कर्तृत्व अजून अधिक उज ळून उफाळून वर आला असत. कदाचित त्याचा फायदा एका फार मोठ्या काळासाठी दादांच्या पुढच्या पिढीला झाला असता…!
  • दादा म्हणजे कालातीत नेतृत्व, ते नेतृत्व आणि नेतृत्वाची अफाट दूरदृष्टी ही नुसती अधोरेखित झाले नसती.
  • तर असा अफाट दूरदृष्टीचा नेता अचानक कसा काय गेला की कोणी घालवला याबद्दल लोकांनी अधिक चौकस पणे प्रश्न विचारले असते कदाचित काही व्यक्ती संस्था अडच णी तही आल्या असत्या…!
  • कोणी सांगावं अजून चार-आठ दिवस थांबले असते तर कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्रही आले असत्या..!!
  • या सगळ्यांना जर फाटा द्यायचा असेल तर दादांचा राज कीय वारसदार कोण ही चर्चा तात्काळ घडवून आणणं गर जेचं होतं…! आणि त्यासाठी तितकी दबावाची परिस्थिती सुद्धा निर्माण करणे गरजेचे होतं.
  • अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रफुल पटेल सुनील तटकरे यांच्यासारखे माणसं तयारच होती म्हणा…
  • वहिनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री होत आहात. विरोधी पक्षातील महिला राजकारणी म्हणून नाही तर ज्या आपुलकीने आपल्याला वहिनी म्हणून संबो धत आहे.
  • त्या नात्याने विनंती करावीशी वाटतेय,”वहिनी सावध असा. पटेल,तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्या ला गुंगी गुडिया समजून मनमानी करायचा प्रयत्न करती ल. पण आपण दादांच्या तालमीत तयार झाला आहात.
  • याचा ठसा उमटवण्याची नियतीने आपल्याला संधी दिली आहे. संधी मिळाली तर महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते. आपण त्यास पात्र आहात.
  • आपल्याला मिळालेली संधी ही निव्वळ अनुकंपा तत्वावर ची संधी नाही तर खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वगुणांना न्याय देणारी संधी आहे हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ.
  • आम्ही दादांचे विरोधक, पण दादांनी विरोधकांनाबद्दल कधी कपटबुद्धी बाळगली नाही. टीका केली तरी त्याचा कडवटपणा मनात साठवला नाही. पण म्हणून कुणाचं निष्कारण लांगुलचलनही केलं नाही.
  • दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, वहिनी ते आ पल्याला सुद्धा माहीत असतील. आपण त्यांचा योग्य तो बंदोबस्त कराल अशी अपेक्षा आहे.
  • वहिनी विरोधक म्हणून प्रश्न विचारायला आम्ही कायम आघाडीवर असू, पण महिला म्हणून जर कोणी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र भगिनीभाव जपत आपल्या सोबत असू.
  • राजकारणातली ही सेकंड इनिंग यशस्वी ठरो या शुभेच्छा सह..!! कळावे. – सुषमा अंधारे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles