कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरारच्या ३ऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार यांच्या ३ वर्धापन दिना चे औचित्य साधून रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी स.९ ते सायं ६.३० वाजेपर्यंत ज्युपिटर स्कूल,मनवेलपाडा गाव, दत्त मंदिर जवळ विरार पूर्व येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • दि. २२ रोजी स. ९ ते दु. २ भव्य रक्तदान शिबिर, सायं ४ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं ५ ते ६ मान्य वरांचे स्वागत व सन्मान सोहळा आणि ६ ते ६.३० वाजता समारोप होईल.
  • या वर्धापन दिन सोहळ्याला श्री अनिल नवगणे – संघाध्य क्ष कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,श्री कृष्णा वणे – सरचिट णीस, श्री हितेंद्रजी ठाकूर – अध्यक्ष बहुजन विकास आघा डी. श्री क्षितिजजी ठाकूर – मा.आमदार, श्री.अजिवजी पा टील – महापौर, सौ. प्रविणाताई ठाकूर – मा.‌प्रथम महिला महापौर वस‌ई विरार शहर महानगरपालिका श्री.माधवजी कांबळे – सहसचिव कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, श्री सं तोषजी कांबळे – युवाध्यक्ष कुणबी युवा मुंब‌ई, श्री सचिन जी रामाणे- सरचिटणीस कुणबी युवा मुंब‌ई आदी मान्यवर उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
  • या सोहळ्याला सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय शाखा विरार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles