
मॉडर्न हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलम ध्ये विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी ‘अक्षरलावण्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

- यावेळी प्राचार्य प्रकाश पाबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे, ग्रॅफोलॉजी तज्ञ् शीतल शिंदे,शिवाजी अंबिके,वृषाली सल गर,उमा बिर्जे,कविता गायकवाड,सुनंदा खेडेकर,अमृता गायकवाड ,उमर शेख उपस्थित होते.

- देवनागरी लिपी ही आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृ तिक वारशाचे प्रतीक असून या लिपीचे जतन आणि अक्ष र सुधारण्यासाठी ही कार्यशाळा घेतल्याचे प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी सांगितले.
- तर अक्षर तज्ञ् मार्गदर्शक नागराज मलशेट्टी यांनी लहानप णापासून सुंदर अक्षरासाठी प्रयत्नपूर्वक सराव केल्यास अक्षर सुधारते असे सांगितले.

- त्यांनी मराठीतील सर्व अक्षरांचा सराव यावेळी करून घेत ला.अक्षरातून आपला स्वभाव प्रगट होत असल्याने सुंदर अक्षर काढा असा सल्ला दिला.
- कार्यशाळेचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन ए कबोटे,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिं ग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,संस्था सदस्य राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











