मॉडर्न प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसा यटीच्या मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर, यमुनानगर, निगडी येथे वार्षिक क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
  • क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन हॉकी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले गणेश पालांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
  • याप्रसंगी संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य,हॉकी खेळाचे उत्कृष्ट मार्गदर्शक व शाळेचे प्रमुख्याध्यापक प्रमोद शिंदे, शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका संगिता घुले, मॉडर्न प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजा रे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा शारदा हागे,माता पा लक संघाच्या उपाध्यक्षा पूनम वाघ,ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक रायगोंडा माशाळे, राज्यस्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू आर्यन गुढेकर, शाळेचा क्रीडा मंत्री ध्रुव नागरगोजे व पालक संघाचे सर्व सदस्य उपस्थितीत होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाविभागाचे प्रमुख कैलास माळी यांनी केले.
  • यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी आपल्या प्रास्ता विकातून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश समजावून सांगितला.
  • प्रमुख पाहुणे गणेश पलांडे म्हणाले,कोणतेही लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत व मनाची तयारी आवश्यक असते.
  • लहानपणापासून खेळाची आवड असल्यास व खेळाचा नियमित सराव केल्याने आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचता येते.
  • यासाठी पालकांचे आणि गुरुजनांचे मार्गदर्शन गरजेचे अ सते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यायामाची व विविध खेळांची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य भा वना,खिलाडूवृत्ती, बंधुभाव,सकारात्मकता इत्यादी मूल्यां ची जोपासना होण्यासाठी तसेच देशाचे आधारस्तंभ अस णारे विद्यार्थी हे शारिरीक व मानसिकदृष्ट्या सशक्त व बळ कट होऊन आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी अशा स्प र्धा महत्वाच्या असल्याचे मत क्रीडामहोत्सवाच्या कार्यक्र माचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केले.
  •  या क्रीडामहोत्सवात विद्यार्थ्यांसाठी रिले स्पर्धा, डॉजबॉ ल, लंगडी,गोल खो-खो,बॉलपास यांसारखे सांघिक खेळ व लिंबू चमचा, 50 मीटर धावणे,अडथळा शर्यत यांसा रख्या वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
  • क्रीडांगणावर विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्व व र्गांचे क्रीडामंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य मशाल प्रज्वलित करण्यात आली.
  • त्यानंतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथी च्या एकूण 350 खेळाडूंनी पाहुण्यांना संचलनाद्वारे मान वंदना दिली.
  • याप्रसंगी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रोग्रे सिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह मा.प्रा.डॉ.निवेदिता एक बोटे, प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
  • कार्यक्रमाचे संयोजन नरेश कांबळे,किरण वारके, भारती साळुंके,रोहिणी माने,शितल गव्हाणे,दत्ता मोरे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles