
राजापूरच्या मूर-तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय; वेदनादायी विधवा प्रथा बंद.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक आणि पुरोगामी सामाजिक निर्णय घेतला आहे.
- गावात वाडीपुरती चालत आलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे.
- या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर मृतदेहासमोरच विधवा स्त्रीचे अलंकार उतरवणे, कुंकू पुसणे यासारखे वेदनादायी आणि अमानवीय प्रकार केले जात होते.

- ही प्रथा अत्यंत दुःखदायक असल्याने ती कायमची बंद क रण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
- मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश बारगोडे, श्री.प्रकाश यद्रु क, सचिव श्री.विलास पवार, श्री.विजय बने, श्री. राजेश ब ने, श्री.विजय पवार, श्री.रघुनाथ गुंडये या मान्यवरांच्या तसेच मुंबई व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
- यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, “हा बदल हो णं ही काळाची गरज आहे. असा निर्णय गावोगावी होणं फार गरजेचं आहे.
- तरच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमतेला आणि स्त्री सन्मानाला चालना मिळेल.”मूर-तांबळवाडीच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






