
परंडा उप अदिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; कामाच्या व्यापामुळे अधिकारी तणावाखाली, रिक्त पदे भरण्याची नागरिकांची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा : येथील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अ नेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने कार्यरत अधि कारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे.
- एकाच व्यक्तीला अनेक टेबलांचा कार्यभार सांभाळावा ला गत असल्याने अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या कामांना बसत आहे.
- या पार्श्वभूमीवर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी आता परंडा तालुक्यातील नागरिकांमधून जोर धर त आहे.

- कामांचा डोंगर आणि मनुष्यबळाचा अभाव
- परंडा उपभूमी अभिलेख कार्यालयांतर्गत जमिनीची मोज णी, पोटहिस्सा नकाशा, वारस नोंद आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येतात. मात्र, कार्यालयात शि.दार, प.भू, आ.जा,लि.क,लि. छा.लि.दपतरबंद अभिलेख पाल,शिपाई ४ एकून ११ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.
- अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना रात्री उशि रापर्यंत काम करावे लागत असून, वाढत्या वर्कलोडमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
- नागरिकांचे हाल
- एकीकडे अधिकारी तणावाखाली असताना, दुसरीकडे शेतकरी आणि नागरिकांना साध्या कामासाठी अनेकदा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
- “वेळेवर मोजणी होत नाही आणि कर्मचारी विचारणा केली तर कामाचा ताण असल्याचे सांगतात,” अशी तक्रार नागरिक करत आहेत.
- शासनाने लक्ष देण्याची गरज
- या गंभीर समस्येकडे वरिष्ठ स्तरावरून लक्ष देऊन परंडा कार्यालयातील रिक्त जागा प्राधान्याने भराव्यात, जेणेकरू न कामाचा खोळंबा थांबेल आणि अधिकाऱ्यांवरील मान सिक ताण कमी होईल.
- लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी पाठपुरावा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











