जनसेवेला समर्पित ५५ वर्षे, जेष्ठ समाजसेवक श्री.राजेंन्द्र लकेश्री नाबाद ७०.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- समाजाप्रती आपली बांधीलकी असून आपण समाजाचे देणे लागतो आपल्या हातून जेवढी समाज सेवा होईल तेवढी करण्यासाठी गेली ५५ वर्षें सातत्याने धडपड करणारे मनाने स्वच्छ आणि प्रा माणिक असे जेष्ठ समाजसेवक – पत्रकार श्री.राजेंन्द्र लके श्री हे ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
  • मुंबईतील कामाठीपुरा सारख्या बहुजन वस्तीत राजेंद्र ल केश्रींचा दि. २० जुलै १९५५ सालात जन्म झाला. वयाच्या जेमतेम तिसऱ्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले.
  • रहायला घर नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत देखील त्यांच्या अशिक्षित पण धैर्यवान मातोश्री सुगंधा आ क्का यांनी धुणी – भांडी – खाणावळ करून दोन मुलांना वाढवले.
  • श्री.राजेंन्द्र लकेश्री यांनी गरिबीची आणि परिस्थितीची जा णीव ठेवून वयाच्या १३ व्या वर्षांपासून दिवसा जमेल ती नोकरी करून रात्री ( ११ वी पर्यंत ) शिक्षण घेतले.
  • घरच्या गरिबीची जाण त्यांनी लहानपणा पासूनच समाज सेवेला झोकून दिले. आज वयाच्या ७१ व्या वर्षांत पदार्प ण करीत असतांना समाजसेवेच्या देखील ५५ व्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचालीस प्रारंभ केला.
  • गेल्या ५५ वर्षात समाजसेवेबरोबर वृत्तपत्रात ५००० च्या वर वृत्तपत्र लेखन करून लोकांच्या अनेक समस्यांना त्यां नी वाचा फोडली मुंबईतील कामाठीपुरा नागपाडा विभागा त बहुजन समाजात काम करणारे जेष्ठ समाजसेवक वृत्त पत्रलेखक व मु‌क्त पत्रकार श्री.राजेंन्द्र लकेश्री हे गेली ५० वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहेत.
  • पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष, दर्पणकार बाळशा स्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार संघाचे प्रमुख सल्लागार, आ खिल वैश्य वाणी समाज महासंघाचे अध्यक्ष, श्री.दत्तगुरू प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र भाडेकरू संघाचे अध्य क्ष, आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा चॅरीटेबल ट्रस्ट महाराष्ट्राचे सं घटन सचिव, महात्मा स्पोर्टस क्लबचे कार्याध्यक्ष, युनिटी चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त, तसेच हमारी सहेली या संस्थेचे संस्थापक – विश्वस्त मराठी वृत्तपत्र लेखक-संघाचे आजिव सदस्य तर मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष या आणि इतर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यपाल श्री.एस.एम. कृष्णा यांच्या हस्ते राज्यातील एकमेव कामगार राज्य भूष ण पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार मुख्यमंत्री श्री.सु धाकरराव नाईक, तर राज्याचा गुणवंत कामगार राज्य पुर स्कार श्री.वसंतदादा पाटील यांच्या हस्ते‌‌ देण्यात आला.
  • मुंबईच्या महापौरांनी सामाजिक सेवा व वृत्तपत्र लेखनाब द्दल दोनदा पुरस्कार तसेच पोलीस आयुक्त जे.एफ.रिबेरो यांनी कामाठीपुराच्या शांततेबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
  • श्री.लकेश्री यांच्या ५५ वर्षाच्या कार्याचा महाराष्ट्र,गोवा आ णि दिल्ली सारख्या राज्यातील मान्यवर अश्या १५० संस्थानी मान- सन्मानासहित १५० पुरस्कार देवून आता पर्यंत गौरव केला आहे.
  • अशा या चतुरस्त्र अर्थात चतुर, चाणाक्ष, प्रामाणिक, चोहि कडे बारकाईने नजर ठेवणारा तरबेज, निष्णात,पारंगत स दैव जागरूक सारखा सतर्क रहाणाऱ्या हुशार व्यक्तिमत्त्वा बदल लिहिताना शब्द अपुरे पडतील श्री.राजेन्द्र लकेश्री यांना उत्तम निरोगी आयुष्य लाभो ते शतायुषी व्हावेत त्यां ना उदंड, निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छांचा त्यांच्या वर वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles