
संत निरंकारी मंडळ कोदवलीतर्फे आडीवरे येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्यावतीने ’प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ’स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे नुकते च देशभर आयोजन करण्यात आले.
- त्याप्रमाणे तालुक्यामध्येही संत निरंकारी मंडळ-कोदवली राजापूर यांच्यावतीने या अभियानाचे आडीवरे आयोजन करताना त्यामध्ये सहभागी झालेल्या शेकडो भक्तगणांनी नदी-नाल्यांसह परिसराची स्वच्छता करीत समाजासमंोर सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श ठेवला.

- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि संत निरंकारी राज पिता रमित जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कर ण्यात आलेले ’प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ’स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियान भारतातील 25 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 930 शहरांमधील 1 हजार 600 हून अधिक ठिकाणी यशस्वीपणे पार पडले.
- या अभियानात सुमारे 12 लाख स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील आ डीवरे येथे संत निरंकारी मंडळ कोदवली-राजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या अभियानाची समावेश आहे.

- संत निरंकारी मंडळ कोदवली-राजापूर ब्रांचचे मुखी सि द्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भगवती मंदीर, श्री महाकाली मंदीर परिसरासह त्या भागातील नदी-नाल्या चीही स्वच्छता करण्यात आली.
- त्यामध्ये नदी-नाल्यातील पाणी प्रदूषित करणारे आणि पर्यावरणाला. घातक ठरणार्या प्लास्टिकसह अन्य कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
- या स्वच्छता अभियानामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला.
- यावेळी संत निरंकारी मंडळाचे सेवादल युनिटचे संचालक दत्तराज सुवार, नारी सत्संग प्रमुख चारूलता चाळके, बा लसत्संग प्रमुख सारीका कोतरे यांसह प्रकाश हातणकर, विजय बंडबे, जयवंत मांडवकर, सुभाष नवाळे, दशरथ लि गम, रामचंद्र मांडवकर, प्रशांत घाणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते.

- ’स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ एक अभियान न सून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवताना च मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संक ल्प आहे.
- येणार्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भ विष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल असा संदेश दास बाळकृष्ण मांडवकर यांनी श्री भगवती देवी च्या प्रांगणामध्ये भक्तगणांना संबोधित करताना दिला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











