
५ वर्षीय जारा शाहरुख मुलानीचा पहिला रोजा; आलिश्वर परिसरात कौतुक…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पवित्र रमजान महि न्यानिमित्त मुस्लीम बांधवांकडून सध्या कडक उपवास (रोजा) पाळले जात आहेत.
- कडक ऊन आणि वाढता उन्हाचा तडाखा असतानाही, परंडा तालुक्यातील आलिश्वर येथील अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने, जारा शाहरुख मुलानी हिने आपला आयुष्या तील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
- जाराने पहाटे ‘सहेरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला पहिला उपवास पूर्ण केला.

- सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी तिचे वडील शाहरुख मुलानी व कुटुंबातील सदस्यांनी तिचे पुष्पहार घालून व कौतुक करून अभिनंदन केले.
- एकीकडे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामुळे रोजा पाळणे कठीण जात असताना, इतक्या लहान वयात जाराने दाखवलेला संयम आणि श्रद्धेचे आलिश्वर परिसरात मोठे कौतुक होत आहे.
- तिच्या या धाडसाबद्दल ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











