
अवैध दारू धंद्यांवर सरपंचांचा ‘दणका’; कोठारे पॅटर्नची तालुक्यात चर्चा….! अवैध मद्यविक्रेत्यांचे साहित्य जप्त करून केले नष्ट; माता-भगिनींकडून निर्णयाचे स्वागत.
- प्रतिनिधी : हिराजी देसले :- गावातील अवैध दारू व्यव सायामुळे अनेक सुखी संसार उद्ध्वस्त होत असताना, के वळ तक्रार अर्ज किंवा मोर्चांवर अवलंबून न राहता कोठारे गावचे सरपंच मा.श्री.चंद्रकांतजी दरोडा यांनी थेट कृतीचा मार्ग अवलंबला आहे.
- त्यांनी गावातील अवैध दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धड क कारवाई करत सर्व साहित्य जप्त केले आणि ते जागी च तोडून टाकले.
- त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, ‘व्यसनमुक्त गावा’साठी हा आदर्श इतर ग्रा मपंचायतींनी घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लाग ली आहे.

- गेल्या अनेक दिवसांपासून कोठारे आणि परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले होते. याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला आणि कष्टकरी महिलांना बसत होता.
- ऐन तारुण्यात तरुणांना व्यसनाची लागण लागल्याने अने क कुटुंबांची वाताहत होत होती. स्थानिक माता-भगिनींनी या संदर्भात सरपंचांकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.
- महिलांच्या हाकेला प्रतिसाद देत सरपंच चंद्रकांतजी दरो डा यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी कोणत्याही दबा वाला बळी न पडता थेट दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकली.
- यावेळी मद्यविक्रीसाठी वापरले जाणारे ड्रम्स, भांडी आणि इतर साहित्य जप्त करून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.
- “गावातील एकही संसार दारूमुळे उघड्यावर पडू देणार नाही, अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा यावेळी सरपंचांनी दिला.
- ‘कोठारे पॅटर्न’ची चर्चा
- साधारणपणे दारूबंदीसाठी पोलिसांकडे तक्रारी केल्या जातात किंवा मोर्चे काढले जातात. मात्र, लोकप्रतिनिधीने स्वतः पुढाकार घेऊन अशा प्रकारे कठोर कारवाई केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- “सरपंच असावा तर असा,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशाच पद्धतीने कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्य क्त होत आहे.

- “अवैध मद्य व्यवसायांमुळे गावातील शांतता आणि तरुणां चे भविष्य धोक्यात येते.
- अशा प्रकारची कठोर कारवाईच या व्यवसायांचे कंबरडे मोडू शकते. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात अशीच भूमिका घेणे काळाची गरज आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











